‘जय श्रीराम’ चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:29 AM2019-04-14T00:29:58+5:302019-04-14T00:31:33+5:30

प्रभू श्रीरामांची सुमधुर भजने, भगवे फेटे घातलेली सळसळत्या रक्ताची तरुणाई, पारंपरिक वेषभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अन् जोडीला देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या सैनिकांना समर्पित देखावे यासह निघालेल्या श्रीराम नवमीच्या शोभायात्रेत प्रभू जय श्रीरामांच्या जयघोषाने नांदेड नगरी दुमदुमली होती़

Glory of 'Jai Shri Ram' | ‘जय श्रीराम’ चा जयघोष

‘जय श्रीराम’ चा जयघोष

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीराम जन्मोत्सव हजारो रामभक्तांचा शोभायात्रेत सहभाग

नांदेड : प्रभू श्रीरामांची सुमधुर भजने, भगवे फेटे घातलेली सळसळत्या रक्ताची तरुणाई, पारंपरिक वेषभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अन् जोडीला देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या सैनिकांना समर्पित देखावे यासह निघालेल्या श्रीराम नवमीच्या शोभायात्रेत प्रभू जय श्रीरामांच्या जयघोषाने नांदेड नगरी दुमदुमली होती़
दुपारी १ वाजता गाडीपुरा येथील मंदिरात महाआरती केल्यानंतर जन्मोत्सवाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली़ एका वाहनावर ठेवलेली प्रभू श्रीरामांची आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत होती़ त्यासमोर ढोलपथक, महापुरुषांच्या झाकी, भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करुन देणारे सैनिकांना समर्पित देखावे, पालखी, राम मंदिराची प्रतिकृती, भजनी मंडळ यांचा शोभायात्रेत समावेश होता़ त्याच्यामागेच स्वच्छतेसाठी स्वयंसेवकांची मोठी फळी कार्यरत होती़ ढोलपथकांच्या तालावर यावेळी तरुणाईने ठेका धरला होता़ त्याचबरोबर साऊंड सिस्टीमवरुन सुरु असलेल्या भजनांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देण्यात येत होता़
शोभायात्रा दुपारी जुना मोंढा टॉवरजवळ आली़ या ठिकाणी ढोलपथकाने आपल्या कलेचे सादरीकरण केले़ सायंकाळी पावणे सात वाजता ही शोभायात्रा वजिराबाद चौकात आली होती़ त्यानंतर शिवाजीनगर भागात येण्यासाठी रात्रीचे साडेआठ वाजले़ शोभायात्रेचे एक टोक शिवाजीनगर ओव्हरब्रीजवर तर दुसरे टोक पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत होते़ यावरुन शोभायात्रेतील गर्दीचा अंदाज येईल़ शिवाजीनगर भागात इमारतीवर उभे राहून नागरिकांनी शोभायात्रा डोळ्यात साठविली़ यावेळी अनेकांनी छतावरुन शोभायात्रेवर पुष्प उधळले़ यावेळी तरुणाईने गाण्यांवर ठेका धरला होता़ रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अशोकनगर येथील मंदिरात आरती करुन शोभायात्रेचा समारोप करण्यात आला़ यावेळी स्वच्छता पथकाने रस्त्यावरील कचरा उचलला़
देखाव्यांनी वेधले लक्ष
शोभायात्रेत हनुमानाच्या वेषभूषेत अनेक चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता़ ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते़ त्याचबरोबर सैनिकांची समर्पित ब्राम्होस, अग्नी या क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या़ सैनिकी वेषात असलेले तरुण भारत माता की जय, जय श्री रामच्या घोषणा देत होते़ शोभायात्रेतील या विविध देखाव्यांनी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले होते़

Web Title: Glory of 'Jai Shri Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.