'तुझ्यासाठी मला देवाने पाठविले'; महिलेवर अत्याचारानंतर पुजाऱ्याचा मुलीवरही अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:34 PM2021-10-11T17:34:54+5:302021-10-11T17:37:56+5:30
Rape on Women : नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील 'गोपाळ'चावडी येथील एका ४० वर्षीय विवाहितेसोबत याप्रकरणातील आरोपी तथा गोपाळचावडी परिसरातील तुळजा भवानी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याची ओळख झाली होती.
नांदेड: विवाहितेचा अंघोळ करतानाचा चोरून काढलेला फोटो समाजात पसरविण्याची धमकी देऊन एका ४० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या पुजाऱ्याने तुझ्यासाठी मला देवानेच पाठविले आहे असे सांगून पीडित विवाहितेच्या तरुण मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला ( the priest rapes on women ) . या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पुजाऱ्याविरूद्ध गुन्हा ( Crime in Nanded ) नोंदवण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील 'गोपाळ'चावडी येथील एका ४० वर्षीय विवाहितेसोबत याप्रकरणातील आरोपी तथा गोपाळचावडी परिसरातील तुळजा भवानी देवीच्या मंदिरातील 'पुजारी' श्रीपाद दिवाकर देशपांडे (रा. हडको, नांदेड) यांची ओळख झाली होती.आरोपी श्रीपाद हा २०१५ मधील मार्च महिन्यात या प्रकरणातील पीडितेच्या घरी गेला होता. पीडिता अंघोळ करीत असताना आरोपी देशपांडे याने त्याचे लपून छायाचित्रण केले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अनेकवेळा अत्याचार केला. पीडितेने विरोध केला असता तुझा आणि तुझ्या मुलांचा सांभाळ करतो. मी तुझ्यासोबत लग्न करतो, मी महाराज आहे, मला तुझ्यासाठी देवाने पाठवले आहे. मी, जे म्हणेल त्याप्रमाणेच तू वागले पाहिजे, असे म्हणून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, पीडित महिला ही पुजारी देशपांडे याच्याकडून तीन वर्षापूर्वी तीन महिन्याची गर्भवती राहिली. त्यानंतरही देशपांडेचे घरी येणे सुरूच होते. त्यात देशपांडे याने पीडितेच्या पोटात लाथ मारून गर्भपात केला. तसेच २० वर्षीय मुलीवरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या मोबाईलवर आरोपीने अश्लील छायाचित्रे पाठविली असेही पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात रविवारी आरोपी पुजारी श्रीपाद देशपांडे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि विश्वजित कासले हे करीत आहेत.
जूनमध्येच पीडितेने केला होता अर्ज
जून महिन्यात पिडीत महिलेने पुजाऱ्याने अत्याचार केल्याबाबत ठाण्यात अर्ज दिला होता. परंतु त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. रविवारीही काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात धाव घेतल्यानंतर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.