कोरोना काळात आरोग्य विभागाने केले चांगले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:22 AM2021-09-05T04:22:40+5:302021-09-05T04:22:40+5:30
नांदेड : जिल्ह्यात आरोग्य विभागाचे कार्य समाधानकारक आहे. या विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील ...
नांदेड : जिल्ह्यात आरोग्य विभागाचे कार्य समाधानकारक आहे. या विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा पाहून आनंद वाटल्याची भावना पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ. संजय रायमूलकर यांनी व्यक्त केली.
तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने ग्रामीण भागातील विविध संस्थांची पाहणी आमदारांच्या शिष्टमंडळाने काल केली होती.
संजय रायमूलकर म्हणाले की, ज्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी दिल्या असता, आरोग्याबाबत ज्या भौतिक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत, त्यातून रुग्णांना लाभ मिळत आहे. जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत तयार केले गेले, तसे रुग्णालय जिल्ह्यात सर्वत्र उभारले जाणे आवश्यक असल्याचे मत डॉ. रायमूलकर यांनी व्यक्त केले.
आरोग्य विभागाच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एक्सरे मशीन, रक्त तपासणी प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया विभाग याची कामे अद्ययावत केली आहेत. ही कामे पंचायत राज समितीच्या निदर्शनास आली. कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगले काम केल्याचे ते म्हणाले.