जिल्हा परिषद शाळेत अक्षरांचा गोपाळकाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:39+5:302021-09-02T04:39:39+5:30
यावेळी शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत इंग्रजी अंक व अक्षरांचा गोपाळकाला साजरा केला. विद्यार्थी गोपाळांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग ...
यावेळी शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत इंग्रजी अंक व अक्षरांचा गोपाळकाला साजरा केला. विद्यार्थी गोपाळांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी शाळेच्या परिसरात वाढलेल्या झाडावर कृष्ण बनलेला युवराज तर्फेवाड तर राधा बनलेली संस्कृती येडे बसून निसर्गाला मित्र बनवा असा संदेश देत होते. तसेच येणाऱ्या काळात इंग्रजी विषयाला महत्त्व येणार असून सर्वांनी इंग्रजी विषय व निसर्गावर प्रेम करावे, असे संदेश बाल गोपाळांनी दिले. यावेळी सर्व मुलांनी हातात इंग्रजी शब्द व अंक धरून हा संदेश दिला. उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख टी. पी. पाटील, मुख्याध्यापक आनंद दरेगावे, व्यंकट मुगावे, प्रल्हाद पवार, बालाजी प्यारलावार, माधुरी मलदोडे, जयश्री बारोळे, जोशी आदींची उपस्थिती होती.