पडीत माळरानावर फळबाग फुलवून घेतले विक्रिमी उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:49 AM2018-11-02T11:49:00+5:302018-11-02T11:49:56+5:30

यशकथा : मौजे बाबूळगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी कैलास अर्जुनराव भंगारे यांनी पडीत, उजाड माळरानावर मोठ्या महेनतीने फळबाग फुलवून विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

got fruitful income from fruit farming on unsed land | पडीत माळरानावर फळबाग फुलवून घेतले विक्रिमी उत्पन्न 

पडीत माळरानावर फळबाग फुलवून घेतले विक्रिमी उत्पन्न 

Next

- प्रकाश गिते (बहाद्दरपुरा, जि.नांदेड)

मौजे बाबूळगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी कैलास अर्जुनराव भंगारे यांनी पडीत, उजाड माळरानावर मोठ्या महेनतीने फळबाग फुलवून विक्रमी उत्पन्न घेतले आहे. तीन उलभ्यात पपईचे एकूण १३ लाख ५० हजार लाखांचे उत्पन्न मिळविले. सध्या पपई तोडणीस आली आहे. यातून त्यांना अंदाजित ६ लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

सन २००० मध्ये कैलास भंगारे यांनी पडीत माळरान असलेली ३ एकर जमीन खरेदी केली व ती जेसीबीच्या साहाय्याने उकरून लागवडी योग्य केली. काही दिवस त्यांनी या जमिनीवर पावसाच्या विश्वासावर पारंपरिक शेती कसली. मात्र, निसर्गाचा सतत लहरीपणा व वेळेवर पाऊस न येणे किंवा जास्त बरसणे, यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती झाली. सन २००९ मध्ये त्यांनी घरासमोर बोअर खोदला. सुदैवाने बोअरला चांगले पाणीही लागले. घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या माळरानावरील शेतीत पाईपलाईन करून सन २०१३ मध्ये पुणे येथून ‘तायवाण-७८६ या पपईच्या बियाणे खरेदी केले.

६० दिवसांनंतर ६० आर क्षेत्रात ५ बाय ६ या अंतराने ११०० रोपाची लागवड केली. पाण्याचे व लागणारे घटक द्रव्य नियोजनबद्द नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रिप ठिबक सिंचनाने काटेकोरपणे पाण्याचा वापर करून ९ महिन्यांनंतर पपई तोडणीस सुरुवात केली. पहिल्याच तोडणीत त्यांना ५ लाखांचे उत्पन्न मिळाले तर पूर्णपणे तोड्याचे ७.५० लाखांचे उत्पन्न मिळाले. याप्रमाणे सतत तीन वेळेस पपईचे उत्पन्न घेतले. दोन वेळात १३.५० लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले, तर खर्च ३ लाख ५० हजार रुपये झाल्याचे भंगारे यांनी सांगितले.  

सध्याचा उलथा हा जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या लागवडीचा तोड १५ दिवसांत सुरुवात होईल व त्यातून ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ६० आर क्षेत्रात ११०० झाडे यातून प्रत्येक झाडाला ९० ते १०० फळे आहेत. प्रत्येक फळ आजघडीला १.५० ते २ किलो वजनाचे आहे. पपईला आज किमान १८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. यानुसार ६ लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास भंगारे यांनी व्यक्त केला. तीन वेळेस एकूण १९.५० लाखांचे उत्पन्न, तर खर्च ५ लाख ५० हजार आहे. याचाच अर्थ असा की, त्यांना खर्च वजा जाता सरासरी १४ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

याकामी कैलास भंगारे यांना त्यांचे थोरले बंधू बाबूराव अर्जुन भंगारे यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदत असल्याचे आवर्जून सांगितले. कैलास भंगारे यांनी साधारण माळरान जमिनीवर दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून, इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. सर्वसाधारण शेतजमिनीवर ते लाखो रुपये उत्पन्न मिळवित असतील तर इतरांना ते का जमू नये, असा सवाल आहे. शेती ही फायद्याचीच आहे. फक्त तिच्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे.

Web Title: got fruitful income from fruit farming on unsed land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.