शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला मिळाले ७ कोटी ८२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:10+5:302021-09-07T04:23:10+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील अनेक विकासकामांचा पाठपुरावा करून या कामांच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करून घेतली ...

Government Ayurvedic College got 7 crore 82 lakhs | शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला मिळाले ७ कोटी ८२ लाख

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला मिळाले ७ कोटी ८२ लाख

Next

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील अनेक विकासकामांचा पाठपुरावा करून या कामांच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करून घेतली होती. त्यानुसार सदरहू निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून महाविद्यालयाची इमारत, संलग्नित रुग्णालय, वसतिगृह आदींसाठी बांधकाम केले जाणार आहे. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीमध्ये महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील रुग्णांच्या वॉर्डासाठी १ कोटी ९७ लाख रुपये, महाविद्यालयाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ९७ लाख रुपये, पदव्युत्तर मुलांच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ८० लाख रुपये, महाविद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी १ कोटी ३१ लाख रुपये, अधिष्ठाता व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ६५ लाख ६७ हजार रुपये, महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या आवारातील भिंतीच्या बांधकामासाठी ५ लाख ५२ हजार रुपये, पदव्युत्तर विद्यार्थांसाठीच्या वसतिगृहाच्या आवार भिंतीच्या बांधकामासाठी ५ लाख ४२ हजार रुपये आदींचा समावेश आहे.

Web Title: Government Ayurvedic College got 7 crore 82 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.