आठ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 07:23 PM2020-08-10T19:23:01+5:302020-08-10T19:25:26+5:30

ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता घेतली लाच

Gramsevak 'ACB' caught taking bribe of Rs 8,000 | आठ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात 

आठ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक 'एसीबी'च्या जाळ्यात 

Next
ठळक मुद्दे 'सिडको' वसाहतीमधील संभाजी चौक परिसरात 'एसीबी'ची कारवाई

नवीन नांदेड : वॉटर प्लॅन्ट टाकण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता आठ हजारांची लाच स्विकारणाऱ्या बळीरामपूर येथील ग्रामसेवक गोविंद गुणाजी माचनवाड यांना नांदेड येथील 'एसीबी'च्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना १० ऑगस्ट रोजी दुपारी नांदेडच्या 'सिडको' परिसरातील 'एसबीआय' बँकेच्या परिसरात घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बळीरामपूर येथील एका २२ वर्षीय तक्रारदाराला वॉटर प्लॅन्ट टाकण्यासाठी बळीरामपूर ग्राम पंचायत कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी गोविंद गुणाजी माचनवाड यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, मुळ तक्रारदार व ग्रामसेवक माचनवाड यांच्यामध्ये तडजोडी अंती १० हजार रूपयांऐवजी ८ हजार रूपये लाच देण्याघेण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने नांदेड येथील 'एसीबी' अर्थातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग्रामसेवक माचनवाड यांच्याविरूध्द तक्रार दिली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीमध्ये ग्रामसेवक माचनवाड यांनी १० हजारांची लाच मागितली असून, तडजोडीअंती ८ हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्याआधारे 'एसीबी'कडून १० ऑगस्ट रोजी नांदेडच्या 'सिडको' वसाहतीमधील संभाजी चौक येथील 'एसबीआय' बँक परिसरात लावण्यात आलेल्या सापळ्यामध्ये ग्रामसेवक माचनवाड हे तक्रारदार यांच्याकडून ८ हजार रूपयांची लाच स्विकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी ग्रामसेवक गोविंद गुणाजीराव माचनवाड (वय- ४० वर्षे, रा. सुनील नगर, बळीरामपूर ता.जि. नांदेड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणाचा पुढील तपास 'एसीबी'चे पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत. ही कारवाई 'एसीबी'च्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीसअधीक्षक अर्चना पाटील, व पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शेषराव नितनवरे, नाईक पो. कॉ. हणमंत बोरकर, किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, नरेंद्र बोडके व अनिल कदम यांनी केली आहे.

Web Title: Gramsevak 'ACB' caught taking bribe of Rs 8,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.