काचीगुडा आणि नारखेड एक्स्प्रेसला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:29+5:302021-01-13T04:44:29+5:30
गाडी क्रमांक ०७६३९ काचीगुडा ते अकोला (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही गाडी ...
गाडी क्रमांक ०७६३९ काचीगुडा ते अकोला (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही गाडी आठवड्यातून एक दिवस दर सोमवारी काचीगुडा येथून सकाळी ७.१० वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम मार्गे अकोला येथे सायंकाळी १८.३० वाजता पोहोचणार आहे, तर गाडी संख्या ०७६४० अकोला ते काचीगुडा (साप्ताहिक) ही विशेष एक्स्प्रेस १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही गाडीसुद्धा आठवड्यातून एक दिवस दर मंगळवारी अकोला येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि वाशिम, हिंगोली, पूर्णा, अकोला, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्गे काचीगुडा येथे रात्री २०.१५ वाजता पोहोचेल. याबरोबरच गाडी संख्या ०७६४१ काचीगुडा ते नारखेर (सहा दिवस) ही विशेष एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही गाडी सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस रोज काचीगुडा येथून सकाळी ७.१० वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, न्यू अमरावती मार्गे नारखेर येथे रात्री २३.१० वाजता पोहोचेल, तर ०७६४२ नारखेर ते काचीगुडा विशेष एक्स्प्रेस १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही गाडीसुद्धा मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस रोज नारखेर येथून सकाळी ४.३० वाजता सुटून आणि वाशिम, हिंगोली, पूर्णा, अकोला, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्गे काचीगुडा येथे रात्री २०.१५ वाजता पोहोचणार आहे.