महामानवाला विनम्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:37+5:302020-12-08T04:15:37+5:30

रस्त्याच्या कामाला सुरुवात नायगाव : धनंज ते कुंटूर या ९ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली. गेल्या ...

Greetings to Mahamanwala | महामानवाला विनम्र अभिवादन

महामानवाला विनम्र अभिवादन

Next

रस्त्याच्या कामाला सुरुवात

नायगाव : धनंज ते कुंटूर या ९ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची अवस्था बेकार होती. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारही केल्या होत्या. उशिरा का होईना नागरिकांच्या तक्रारीची दखल घेण्यात येऊन काम सुरू करण्यात आले.

दत्तनाम सप्ताहाचा समारोप

लोहा : तालुक्यातील गुरुवर्य प्रयागगिरी महाराज भक्त आश्रम डोलारा येथे चातुर्मास समाप्ती सोहळा व अखंड दत्तनाम सप्ताह कार्यक्रम ६ रोजी संपन्न झाला. यानिमित्त साध्वी दुर्गादेवी यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाला महंत गंगानंदजी गिरी महाराज यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

दिव्यांग दिन साजरा

उमरी : तळेगाव येथील गोदावरी शिक्षण संस्थेच्या वतीने दिव्यांगांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव अमृतवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव येलमगोंडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम देशमुख, मधुकर तुप्तेवार, बी.बी. खतगाये, सतीश देशमुख, मुख्याध्यापक एस.एन. सुरकुटवार, सहशिक्षक व्ही.एन. तुमवार, एस.डी. पवार, के.पी. तिजरे, बी.जी. डोंगरे, एम.एल. जगदंबे, एम.आर. कोलेवाड, लिपिक डी.बी. कदम, गोविंद वैजाळे उपस्थित होते.

पीक कर्ज वाटप

मुक्रमाबाद : येथील एसबीआयच्या शाखेकडून १ हजार ५०० शेतकऱ्यांना ९ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती शाखा प्रबंधक नवीन प्रजापती यांनी दिली. महात्मा जोतिबा फुले योजना २०१९ मधील एकूण १४०० शेतकऱ्यांना व इतर १०१ अशा १५०१ शेतकऱ्यांना बँकेने वेळे पीक कर्ज वाटप केले. याकामी बँकेचे महेश नाईक, लोकेश कोकडे, विजय शाहू, अंकुश मंदे, उमाकांत जावळे, प्रकाश घंटलवार, राजू गायकवाड यांनीही परिश्रम घेतले.

अवैध वाळू उत्खनन

मुदखेड : मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्राह्मणवाडा येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. गावाशेजारी असलेल्या गुरुद्वारा हिराघाड, भवानी मंदिर तसेच परिसरात अवैध उत्खनन सुरू आहे. उपसा केलेली वाळू मोठ्या प्रमाणात साठवण केली जाते. ब्राह्मणवाडा ते पाथरड रेल्वे मार्गाने शेकडो टिप्पर व हायवा वाहने भरून धावत असतात. महसूल विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.

जागतिक मृदा दिन

मुदखेड : तालुक्यातील जवळा फाटक येथे तालुका कृषी अधिकारी व आत्मा मुदखेडच्या ५वतीने जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी सभापती लक्ष्मणराव जाधव होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सुनील कुरी यांनी केले. मंडळ कृषी अधिकारी वाघमारे, कृषी सहायक अनुप मोरे, राम कपाटे यांनीही वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन धुमाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी कृषी सहायक, व्यंकटेश पाकलवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कृषी सहायक श्रीमती रेशमलवाड, श्रीमती देशमुख, श्रीमती शिंदे, श्रीमती हाटकर, श्रीमती शेख, संजय भिसे, अशोक मुंगल, आनंदराव उबाळे, विठ्ठल जाधव, बालाजी भोकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Mahamanwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.