संत गाडगे महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:51+5:302020-12-23T04:14:51+5:30
आरोपीला फाशी द्या उमरी - बिलोली येथील मूकबधीर अपंग मुलीवरील बलात्कार व तिचा खून करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी ...
आरोपीला फाशी द्या
उमरी - बिलोली येथील मूकबधीर अपंग मुलीवरील बलात्कार व तिचा खून करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष डॉ.जहीरोद्दीन पठाण, जिल्हा संपर्क प्रमुख सय्यद फेरोज पटेल, मोगल आवेस बेग, रईस पठाण, शेख समीरोद्दीन, मसुद मौलाना, अल्मास पटेल, उद्धव मामडे, शेख मस्तान, शेख रियाज, सरफराज पठाण, शादुल्ला पटेल, अरबाज बेग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोलंबीकर यांचे व्याख्यान
नांदेड - मनुस्मृती दहन दिन व नाताळ दिन २५ डिसेंबर रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह नवीन नांदेड येथे ज्येष्ठ विचारवंत पी.बी. वाघमारे यांचे समाजास गतीमान नेतृत्वाची गरज या विषयावर व्याख्यान घेण्यात येणार आहे. उद्घाटन डॉ.गंगाधर सोनकांबळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी मारोती चिवळीकर राहणार आहेत. कार्यक्रमाला व्ही.जे. वरवंटकर, शंकरराव शिंदे, माधवराव डोम्पले, तुकाराम टोपे, दत्तात्रय पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.
कदम यांना पीएच.डी.
धर्माबाद - लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी सीमा कदम यांना उच्चशिक्षा आणि शोध संस्थान दक्षिण भारत हिंदी प्रचारसभा मद्रास, हैदराबादच्या वतीने पीएच.डी. प्रदान करण्यात आली.त्यांना गाईड म्हणून डॉ.विजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले.
अंबेकर पर्यवेक्षकपदी
कंधार - उस्माननगर येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ (मोठी लाठी) संचलित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगरच्या पर्यवेक्षकपदी कलाध्यापक राजीव अंबेकर यांची नियुक्ती झाली. या निमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तमराव देशपांडे, श्यामसुंदरराव जहागीरदार, उपाध्यक्ष कमलाकरराव देशपांडे, सचिव बी.डी. कुलकर्णी, सहसचिव टी.एस. वारकड, कोषाध्यक्ष अनिरूद्ध शिरसाळकर, प्रदीप देशमुख, मुख्याध्यापक गोविंद बोदमवाड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
दानपेटी फोडली
लोहा - तालुक्यातील बोरगाव किवळा येथील आनंदगिरी महाराज मठसंस्थानमधील दानपेटी फोडून त्यातील काही रक्कम चोरट्यांनी लांबविली. पुजारी अवधूत गिरी एका कार्यक्रमानिमित्ताने गेले होते. दुपारी ३ च्या दरम्यान ही घटना घडली. यात चोरट्याने दानपेटीतील एक हजार रुपये लांबविले. सोनखेड पोलिसात या घटनेची नोंद घेण्यात आली. तपास सुरू आहे.