मुगट येथे किराणा दुकानाआढ दारूविक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:54+5:302020-12-11T04:44:54+5:30
गावातील नवी आबादी येथील किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री चालू आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करून सुद्धा ...
गावातील नवी आबादी येथील किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री चालू आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करून सुद्धा ही अवैध दारूची दुकाने खुलेआमपणे आता चालूच आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे डोळेझाक केल्यामुळे ही अवैध दारू विक्री करणा-यांना काेणाचीच भय राहिले नसून ते आज उदंड झाले आहेत. रात्री आणि सकाळी या मुख्य रस्त्यावरच दुचाकी-चारचाकी वाहने थांबत आहेत.अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीच या दुकाना जवळपास अपघात झाले आहेत. या अवैध दारू विक्री दुकानाच्या जवळ राहणाऱ्या तळीरामाचा सकाळी ५पासुन ते रात्री १०पर्यंत नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. ड्राय डे च्या दिवशी सुद्धा अवैध दारूची दुकाने खुलेआमपणे चालूच होती.
याच मुख्य रस्त्यावरून मुदखेड भोकरचे शासकीय अधिकारी दररोज जात असतात पण यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील किराणा दुकान दारू विक्री करणारी केंद्रे ही दिवसेंदिवस वाढत आहे.
गावातील ग्रामपंचायत कडून या किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्रीला पडद्याआड समर्थन मिळत असल्याचे नागरिक म्हणत आहेत. याच ग्रामपंचायतने मुदत संपन्यापूर्वी गावाच्या जवळच एका बार, दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाखाच्या आसपास रक्कम घेतली गेली अशी गावात चर्चा सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी या किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध दारुची विक्री बंद करण्यासाठी कुणाकडे जावे असा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे.