पालकमंत्री, खासदारासह आमदारही चिडीचूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:36+5:302021-04-07T04:18:36+5:30
जिल्हा प्रशासन म्हणते की कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी पुरेसे बेड उपलब्ध आहेत. अनेकांना रुग्णांना सोबत घेवून उपचारासाठी खासगी, शासकीय दवाखान्यांचे ...
जिल्हा प्रशासन म्हणते की कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी पुरेसे बेड उपलब्ध आहेत. अनेकांना रुग्णांना सोबत घेवून उपचारासाठी खासगी, शासकीय दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. हे वास्तव बघायला महापालिका प्रशासनासह पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांना वेळ नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेतील एक बाधित वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, गेली आठ दिवस मी कोविडने संसर्गित असून, जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा गलभानपणा मी अनुभवतो आहे. प्रशासकीय, आरोग्य विभागाचे अधिकारी हे सगळ्या सुविधा आहेत, असे म्हणत आहेत. पण कोणत्याही दवाखान्यात खाट मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी स्वता सहा ते सात हॉस्पीलटचे फेरे मारुन दमून गेलो.
ज्यांना दवाखान्याच्या ट्रीटमेंची गरज आहे? त्यांच्यासाठी काय सुविधा आहे? कुठल्या सुविधा जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेल्या आहेत? असा प्रश्न पडत आहे. रेमेडेसीवीर इंजेक्शन दवाखान्यात नाहीत. काळ्या बाजारात पाच पटीने उपलब्ध होते. हे सगळं वास्तव भयाण आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येवू नये, याचे आश्चर्य वाटत आहे.
काय म्हणतात बाधित रुग्णांचे नातेवाईक
माझे साडू जे विवेकनगर इथे राहतात. त्यांची ८५वर्षीय आई कोविड पॉझिटिव्ह आहे. या वृद्ध मातेला रविवारी जंगमवाडी इथून गाडीत बसवून ओम गार्डन जवळच्या कोविड सेंटरला नेण्यात आले. तिथे गेल्यावर रुग्णांचे वय पाहून तिथं ॲडमिट करुन घेण्यास नकार दिला. दुदैवाने माझे साडू त्या गाडीमागे गेले होते. कितीही विनंती करुन तिथल्या लोकांनी या वृद्ध रुग्णाला तीथून अक्षरशा हाकलले. ज्या गाडीने ही वृद्ध व्यक्ती तीथपर्यंत गेली, त्या गाडीचालकाने हात वर केले. नाईलाज म्हणून माझे साडून पाच ते सहा हॉस्पीटलमध्ये फिरले पण, बेड मिळाला नाही.