जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ता योजना राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:17 AM2021-02-10T04:17:56+5:302021-02-10T04:17:56+5:30
२२ फेब्रुवारीपर्यंत अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे केले जातील. तर २२ फेब्रुवारी रोजीच तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती ...
२२ फेब्रुवारीपर्यंत अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे केले जातील. तर २२ फेब्रुवारी रोजीच तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचे आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती रस्त्यांच्या कामाबाबत निर्णय घेणार आहे. मनरेगा तसेच अन्य योजनेतून ही कामे करता येतील का, यावर निर्णय घेतला जाईल.
पालकमंत्री शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत अतिक्रमणमुक्त करून तयार केलेले कच्चे रस्ते तसेच अतिक्रमित नसलेले कच्चे रस्ते मजबूत करण्यासाठी मनरेगांतर्गत निधी प्राप्त करून दिला जाणार आहे.
२७ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण माहिती सादर करून निधी बाबतचीही माहिती द्यावी, असेही नमूद केले आहे.
चौकट--------------
५०० रस्त्यांच्या कामांचे उद्दिष्ट
पालकमंत्री शेत, पाणंद योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५०० रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात पाणंद रस्ते मजबुतीकरणाचा प्रयोग भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. हा प्रयोग आता जिल्हाभर राबिवण्यात येणार आहे. यासाठी कालबद्ध आराखडाही तयार केला आहे. त्याची निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.