पालकमंत्र्यांनी घेतला ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’च्या उभारणीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:21+5:302021-01-08T04:53:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’च्या ...

The Guardian Minister reviewed the construction of 'Ashok Chavan Seva Setu' | पालकमंत्र्यांनी घेतला ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’च्या उभारणीचा आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’च्या उभारणीचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’च्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली.

‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ या सुविधेचे येत्या २६ जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यामार्फत वैयक्तिक स्तरावर सुरू होणारी ही खासगी सुविधा म्हणजे एक कॉल सेंटर असून, येथील दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून नागरिकांना शासकीय कामकाजाबाबत आपल्या अडीअडचणी किंवा तक्रारी मांडता येणार आहेत. दररोज शेकडो नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी नांदेड येथील आपल्या कार्यालयात येतात. त्यातील अनेक अडचणी या दूरध्वनीवरून मार्गी लावण्यासारख्या असतात. त्यामुळे अशा नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्या, या हेतूने ‘अशोक चव्हाण सेवा सेतू’ ही सुविधा सुरू केली जाणार आहे. या कॉल सेंटरचा क्रमांक लवकरच जाहीर केला जाईल. प्रारंभी प्रायोगिक स्तरावर ही सुविधा भोकर विधानसभा मतदार संघासाठी सुरू होणार आहे. नांदेड शहरात उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक कॉल सेंटरची पालकमंत्र्यांनी साेमवारी पाहणी केली व तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

Web Title: The Guardian Minister reviewed the construction of 'Ashok Chavan Seva Setu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.