वसतिगृहाची नूतन इमारत बांधकामासाठी पालकमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:05+5:302021-02-05T06:08:05+5:30
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गजभारे यांच्या प्रश्नाला तत्त्वता मान्यता देऊन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाज ...
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गजभारे यांच्या प्रश्नाला तत्त्वता मान्यता देऊन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाज कल्याण अधिकारी आदींनी जयभीमनगर येथील शासकीय वसतिगृहाला भेट देऊन आराखडा सादर करावा व समाज कल्याण अधिकारी यांनी कार्यपालन अधिकारी म्हणून पाठपुरावा करून या संदर्भातला अहवाल सादर करावा, असे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
चौकट--------------
नांदेडात १ हजार विद्यार्थ्यांचे वसतिगृह निर्माण करा -आ. राजूरकर
औरंगाबाद- लातूर येथे सर्वच जाती- धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी १ हजार विद्यार्थ्यांचे वसतिगृह बांधण्यात आले आहे. तेथे दर्जेदार सुविधा उपलब्ध आहे. त्याच धरतीवर मुला- मुलींसाठी १ हजार संख्येचे वसतिगृह निर्माण व्हावे, असा मुद्दा आ. राजूरकर यांनी उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तत्त्वता मान्यता देऊन त्याचा देखील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.