हदगाव पंचायत समितीत मार्गदर्शन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:23+5:302020-12-13T04:32:23+5:30

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवून आयकर भरणाऱ्या ...

Guidance meeting in Hadgaon Panchayat Samiti | हदगाव पंचायत समितीत मार्गदर्शन बैठक

हदगाव पंचायत समितीत मार्गदर्शन बैठक

googlenewsNext

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवून आयकर भरणाऱ्या व इतर कारणांमुळे अपात्र ठरल्या. जिल्ह्यातील ११ हजार ७६३ लाभार्थ्यांकडून लाभाची ९ कोटी १६ लाख रूपये वसुली, सर्व गावातील सर्व लाभार्थ्यांचे सामाजिक अंकेशन, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी, पोर्टवरील लाभार्थी विविध तांत्रिक कारणामुळे लाभ थांबले असल्यास त्याबाबतची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . सदरील योजनेचा लाभ जिल्ह्यातील अपात्र लोकांनीही घेतल्याचे दिसून आले आहे. तरी अशा लाभार्थ्याचा शोध घेऊन त्यांना योजनेतून कायमस्वरुपी वगळण्यासाठी सर्व ग्राम स्तरावर उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आयकर भरणाऱ्या व इतर कारणांमुळे अपात्र झालेल्या हदगाव येथील ८८९ अपात्र लाभाथ्याकडून ८१,६८००० रुपयांची वसुली केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Guidance meeting in Hadgaon Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.