कोरोना संकटात गुरुकुलचा पालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:10+5:302021-02-08T04:16:10+5:30
नवीन नांदेडातील कौठा भागात असलेल्या नागार्जुना पब्लिक स्कूलने शुल्कात ३५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या सिडकोतील नालंदा ...
नवीन नांदेडातील कौठा भागात असलेल्या नागार्जुना पब्लिक स्कूलने शुल्कात ३५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या सिडकोतील नालंदा हायस्कूलमध्येही ही सूट राहिल असे नागार्जुना पब्लिक स्कूल प्रशासनाने सांगितले. त्यामुळे काही अंशी का होईना पालकांना दिलासा मिळाला आहे. नांदेड शहरातील वेलिंग्टन विद्यालयानेही २० टक्के शुल्क कमी केले आहे.
इंग्रजी शाळांबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली असताना कच्छवेज गुरूकूल स्कूलने मात्र यावर्षी शैक्षणिक शुल्कात तब्बल ७५ टक्के सूट दिली जाईल असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला. कोरोना काळात गुरूकूलने ऑनलाईन शिक्षण दिले. शाळेतील श्रीनिवास सूर्यवंशी, अक्षत कच्छवे, अंजली गोरे, नेहा लुटे पाटील, विनायक मोरे, आदित्य भारती व श्रध्दा वैद्य हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले. शाळेच्या शुल्क माअीच्या निर्णयाबद्दल नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर कमटलवार यांच्या हस्ते गुरूकूलच्या संचालिका दुर्गादेवी कच्छवे यांना गौरविण्यात आले. यावेळी बालासाहेब कच्छवे, आदित्य कच्छवे, सचीन वसरणीकर, प्रशांत बारादे, शिल्पा कत्तेवार आदींची उपस्थिती होती.