भोळ्या पावसाने माजविला हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:37+5:302021-09-08T04:23:37+5:30

चौकट- पुर्नवसनाचा प्रश्न असताना आता पुन्हा उघड्यावर मुखेड तालुक्यातील येवती या गावाचा १९८३ पासून पुर्नवसनाचा प्रश्न कायम आहे. मंगळवारी ...

Hahakar majvila rain | भोळ्या पावसाने माजविला हाहाकार

भोळ्या पावसाने माजविला हाहाकार

Next

चौकट- पुर्नवसनाचा प्रश्न असताना आता पुन्हा उघड्यावर

मुखेड तालुक्यातील येवती या गावाचा १९८३ पासून पुर्नवसनाचा प्रश्न कायम आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने त्यांच्या घरात पाणी शिरले होते. यात घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. ग्रामस्थांच्या मदतीने नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात या गावात पाणी शिरते.

चौकट- १६ वर्षानंतर उघडले १२ दरवाजे

रविवारपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी प्रकल्पाचे तब्बल आठ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात येत होता. रात्रभर या दरवाजातून पाणी सोडल्यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत एकुण १२ दरवाजे उघडण्यात आले. अद्यापही प्रकल्पात येवा सुरूच आहे. तब्बल १६ वर्षानंतर विष्णूपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. सध्या १२ दरवाजातून १ लाख ५६ हजार ३७० क्यूसेक वेगाने गोदावरीत विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली.

चौकट- गोवर्धन घाट, दासगणू पूल पाण्याखाली

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गोवर्धन घाट स्मशानभूमी पाण्याखाली गेली होती. त्यामुळे अत्यंसंस्काराची पर्यायी व्यवस्था सिडको येथील स्मशानभूमीत करण्यात आली आहे. संत दासगणू महाराज पुलावरूनही पाणी वाहत होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावर दुपारी एका अज्ञात युवकाचा मृतदेह वाहून आला होता. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Hahakar majvila rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.