पावसाचा हाहाकार; अर्धापूरात पूरात अडकलेल्या २ कामगारांची सुटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 12:09 PM2022-07-09T12:09:28+5:302022-07-09T12:10:38+5:30

बामणी येथे कामगार पुराच्या पाण्यात अडकले; राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

Hail of rain; Two workers stranded in Ardhapur floods released, many villages cut off | पावसाचा हाहाकार; अर्धापूरात पूरात अडकलेल्या २ कामगारांची सुटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

पावसाचा हाहाकार; अर्धापूरात पूरात अडकलेल्या २ कामगारांची सुटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

Next

- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) :
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पावसाने सुरुवात केली असून काल रात्री झालेल्या पावसाने तालुक्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर बामणी येथील काहीजण पुराच्या पाण्यात अडकले आहेत घटनास्थळी जिल्हाधिकारी दाखल राज्य आपत्ती दलाची शोध मोहीम सुरू

शेलगाव येथील नागरिकांचा संपर्क तुटला
असना नदीस पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेलगाव येथील पुलावण पाणी जात असल्यामुळे संपर्क तुटला आहे तर अनेकांचे पशुधन पाण्यात अडकले आहेत.

तालुक्यात १४४ मि.लि पाऊस; घटनास्थळी प्रशासन दाखल
तालुक्यात मॅन्युअल मोजणी प्रमाणे अंदाजे १४४ मि.लि पावसाची नोंद झाली आहे तर तालुक्यात आतापर्यंत ३६२ मिमि पावसाची नोंद झाली आहे. सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विपिन इटणकर, अर्धापूर तहसील, पंचायत समिती कृषी विभाग, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर, मारोतराव जगताप, गटविकास अधिकारी मीना रावताळे, पोनी अशोक जाधव, मंडळ अधिकारी संजय खिलारे, प्रफुल्ल खंडागळे व कृषी अधिकारी कृषी कर्मचारी तहसीलदार तलाठी आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बामणीत दोन कामगारांची पुरातून सुटका 
बामणी इथे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन मजूर अडकून पडले होते, एसडीआरएफ च्या पथकासह गावकऱ्यांनी बचाव कार्य राबवत या दोन्ही मजुरांना वाचवलय. दोन्ही मजूर हे झारखंड राज्यातील असून पुलाच्या सुरू असलेल्या कामावर ते थांबले होते. मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने हे दोघे जण पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाने सकाळ पासून मदतकार्य करत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले.

Web Title: Hail of rain; Two workers stranded in Ardhapur floods released, many villages cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.