हातगाड्यांमुळे वारंवार वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:38+5:302021-06-17T04:13:38+5:30

सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन नांदेड : ग्रामपंचायत गोपाळचावडी येथील खटके कॉलनी येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे ...

Handcarts frequently disrupt traffic | हातगाड्यांमुळे वारंवार वाहतूक विस्कळीत

हातगाड्यांमुळे वारंवार वाहतूक विस्कळीत

Next

सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

नांदेड : ग्रामपंचायत गोपाळचावडी येथील खटके कॉलनी येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या गरीब वस्ती निधीअंतर्गत करण्यात आले. या कामावर पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे. कार्यक्रमाला उपसरपंच साहेबराव सेलूकर, आशीर्वाद डाकोरे, माजी उपसरपंच मोहन खटके, अनिल धमने, रमेश तालीमकर, प्रदीप लाखे, नवनाथ डाकोरे, प्रदीप खटके आदी उपस्थित होते.

वाळूमाफियांवर गुन्हा दाखल

लोहा : कौडगाव, ता.लोहा येथील पोलीसपाटील सुभाष कदम यांना वाळूमाफियांनी मारहाण केली. वाळूमाफियांवर उस्माननगर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना १३ रोजी रात्री १ वाजता घडली होती. आरोपींना अटक करण्यात आली. घटनेचा पोलीसपाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, तालुकाध्यक्ष वैजनाथ पांचाळ आदींनी निषेध केला.

बियाणे खरेदीत लूट

लोहा : मारतळा परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला. कृषी दुकानावर शेतकरी खरेदी करीत आहेत. मात्र काही दुकानदार या संधीचा फायदा घेत सोयाबीनचे बियाणे मुबलक असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करीत आहेत. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालकमंत्री चव्हाण यांचे स्वागत

बिलोली : पालकमंत्री अशोक चव्हाण विकासकामाच्या शुभारंभ दौऱ्यावर जात असताना अर्जापूर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गावाच्या विकासाचे निवेदन देण्यात आल्याची माहिती सरपंच सिद्धांत पतंगे यांनी दिली. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव कोरडवार, बाबा पटेल, दत्तात्रय पापुलवाड, साईनाथ शेटीवार, इम्तियाज शेख, गंगाधर सोबेकर, गौरजी शेटीवार, जमालोद्दीन शेख, विजय गंगुलवार आदी उपस्थित होते.

कुरुळा परिसरात खरिपाच्या पेरण्या

कंधार : कुरुळा परिसरात आतापर्यंत २५६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतकरी कामाला लागले आहेत. त्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली. कपाशी लागवडीवर भर दिला जात आहे. याशिवाय सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, कारळ या पिकांचीही लागवड केली जात आहे.

निवडणूक भत्ता बँकेत जमा

उमरी : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्त्यापोटी पाच लाख ८० हजार रुपये बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांनी दिली. शिक्षक, पोलीस शिपाई व इतर असे ७१९ कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली होती. यात बँक ऑफ बडोदा, एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पैसे वर्ग करण्यात आल्याचेही बोथीकर म्हणाले.

करखेली परिसरात पाऊस

धर्माबाद : तालुक्यातील करखेली परिसरात रविवारी व सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्याने कापूस लागवडीस सुरुवात करण्यात आली आहे. पाऊस एकदिवस आड मध्यम तर कधी जोरदार पडत आहे. त्यामुळे शेतकरी नव्या जोमाने, नव्या उमेदीने बियाणांची पेरणी करीत आहे.

११० मिमी पावसाची नोंद

भोकर : भोकर तालुक्यात मृग नक्षत्रात ११० मिमी पावसाची नोंद झाली. १३ व १४ जूनच्या रात्री चांगला पाऊस झाला. तालुक्याचे खरिपाचे क्षेत्र ४९ हजार हेक्टर असून, चालूवर्षी सोयाबीनकडे कल कमी आहे. कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

कामठा येथे वृक्षारोपण

कामठा बु. : येथील बसवेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विविध झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक रवींद्र जिल्लावार, उपमुख्याध्यापक शिवानंद दासे, सुभाष वलबे, ज्ञानेश्वर खुळे, वैजनाथ कामठेकर, अंबादास अटपलवार, जनार्दन लोखंडे, अरविंद कपाळे, भुजंग दासे, केशव सूर्यवंशी, राजेश पंडित आदी उपस्थित होते.

तहसीलदारांची भेट

उमरी : तहसीलदार माधव बोथीकर व नायब तहसीलदार कृष्णा घुगे यांनी तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शाळांतील सोयी-सुविधांची पाहणी केली. कावलगुडा खु. येथे बोथीकर यांनी तर घुगे यांनी तळेगाव व बळेगाव शाळेला भेट दिली.

विकासकामांची मागणी

नायगाव : तालुक्यातील विविध भागातील मुस्लीम समाजाच्या विकासकामांची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस वसंत सुगावे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांच्याकडे करून त्यांना मागणीचे निवेदन दिले. मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमीत संरक्षित भिंत, रस्ता, नमाज ओटा, सुशोभीकरण शादी खाना आदी कामांकडे नवाब मलीक यांचे लक्ष वेधण्यात आले.

मयत शिक्षकांना श्रद्धांजली

लोहा : कोरोनाकाळात लोहा शहर व परिसरातील काही शिक्षकांचे निधन झाले. शिवछत्रपती माध्यमिक शाळेतील प्रशांत मोटारवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देशमाने, महाजन, पांचाळ यांच्यासह मयत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी.ई. वडजे, एच.जी. पवार, बी.एन. गवाले, आर.आर. टीटलवाड, एस.एच. शेख, व्ही.एच. गुद्दे, यू.आर. सराफ, श्रीमती आढाव, मीनाताई पवार, एस.आर. शेटे, हरीश दुधमल आदी उपस्थित होते.

अंजली मिनके यांचा सत्कार

उमरी : राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत अंजली गंगाधर मिनके यांनी घवघवीत यश मिळविले. याबद्दल तिचा धानोरा बु. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. ती शारदा विद्यालय धानोरा बु. येथील विद्यार्थिनी आहे. कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष सुधाकर देशमुख, सरपंच इरबाजी टोंपे, उपसरपंच कैलासराव देशमुख, आनंदराव सलगरे, दिगंबर जगताप, मुख्याध्यापक पी.एस. चिंतलवाड, शिवाजी डुबुकवाड, ग्रामपंचायत सदस्य पंढरी डवरे, काळबा वाघमारे, दत्ता पाटील, जी. के. सिद्देवाड, पोलीसपाटील दिगंबर दासलवाड, गंगाधर मिनके, आरोग्यसेविका ज्योती चंदनकर, डॉ. भरतभूषण गजभिये, आचेवाड, अनिल मेडेवार, सुरेश चंभोले, गंगाधर वाडीकर, दिगंबर जगताप, गंगाधर मामडे आदी उपस्थित होते.

शंकर मोरे सेवानिवृत्त

कंधार : येथील पालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी शंकर माणिकराव मोरे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी नगरसेवक सुधाकर कांबळे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, फौजदार केंद्रे, माजी सभापती गणेश कुंटेवार, राष्ट्रवादीचे राजकुमार केकाटे, भाजपचे ॲड. गंगाप्रसाद यन्नावार, मारोती गायकवाड, दयानंद कदम, नितीन मोरे, ॲड. सागर डोंगरजकर, विस्तार अधिकारी मळगे, महेश मोरे, रवि कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Handcarts frequently disrupt traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.