नांदेड जिल्हा कचेरीसमोर दिव्यांगांचे बेमूदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:17 AM2018-01-19T00:17:23+5:302018-01-19T00:18:08+5:30
दिव्यांगाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग मित्रमंडळ संघर्ष सेनेच्यावतीने बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनात जिल्हाभरातील दिव्यांग सहभागी झाले आहेत़ त्यात वृध्दांचाही समावेश आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: दिव्यांगाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग मित्रमंडळ संघर्ष सेनेच्यावतीने बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनात जिल्हाभरातील दिव्यांग सहभागी झाले आहेत़ त्यात वृध्दांचाही समावेश आहे़
दिव्यांगांच्या प्रश्नावर जिल्ह्यात अपंग मित्र मंडळ संघर्ष सेनेच्यावतीने आतापर्यंत जिल्हाधिकाºयांसह विविध विभागप्रमुखांशी चर्चा करण्यात आली़ मात्र दिव्यांगांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही़
उपोषण, मोर्चा, भीक मागो आंदोलन, मुंडन आंदोलन असे विविध १७ प्रकारचे आंदोलन करण्यात आले़ मात्र याची दख न घेतल्याने दिव्यांगांनी १८ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलनाला प्रारंभ केला आहे़
धरणे आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली़ मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन बेमूदत सुरू ठेवण्याचा निर्धार दिव्यांगांनी केला आहे़ जवळपास ३०० दिव्यांग या आंदोलनात सहभागी झाले आहेत़
दिव्यांगांना दिले जाणारे प्रमाणपत्र हे अपात्र व्यक्तींना देण्यात येऊ नयेत, दिव्यांगांचे या ना त्या कारणांमुळे नाकारलेले प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावेत, दिव्यांगाना शासनाच्या योजनांचा लाभ नियमितपणे द्यावा, दिव्यांगांचा तीन टक्के निधी वेळेवर खर्च करावा, दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत़ आंदोलनात चंपतराव डाकोरे, विठ्ठल कतरे, पठाण इम्रानखान,अशोक मुळेकर, संतोष चाभरेकर, शंकर मुपडे, कलावती पोहरे, अशोक कानगुले, शेषराव रंडाळे, व्यंकटराव जाधव, बापुराव लामदाडे, भानुदास शिंदे, रामजी लांडगे आदींचा समावेश आहे़