हट्टा शाळेचे गु-हाळ कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:25 AM2019-01-17T01:25:10+5:302019-01-17T01:25:38+5:30
वसमत तालुक्यातील हट्टा येथील जि.प.शाळेच्या प्रश्नाचे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले गु-हाळ आजच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच गाजले. या एकाच मुद्यावर तासभर चर्चा झाली अन् पुन्हा सीईओंकडे स्वतंत्र बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले.
हिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा येथील जि.प.शाळेच्या प्रश्नाचे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले गु-हाळ आजच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच गाजले. या एकाच मुद्यावर तासभर चर्चा झाली अन् पुन्हा सीईओंकडे स्वतंत्र बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले.
सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे होत्या. यावेळी सीईओ एच.पी. तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, सुनंदा नाईक, रेणूका जाधव, अति. मुकाअ पी.व्ही. बनसोडे, उपमुकाअ नितीन दाताळ यांची उपस्थिती होती. यावेळी सुरुवातीलाच जि.प.सदस्य बाळासाहेब मगर हे अधिकाऱ्यांना दरडावत आहेत की प्रश्न विचारत आहेत? अशी परिस्थिती होती. त्यांनी शालेय पोषण आहाराचा मुद्दा मांडताना शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही मिळत नसल्याने या विभागात कामात कुणाचे लक्षच नसल्याचा आरोप केला. तर यासंदर्भात नोटिसा देण्याची मागणी केली. त्यानंतर दुर्धर आजाराची रक्कमही संबंधितांच्या खात्यावर जमा झाली नसल्याचे समोर आले. यात उपाध्यक्ष पतंगे यांनी खात्री करून रक्कम जमा करावी, असे आरोग्य अधिकाºयांना सांगितले. त्यानंतर पाणीपुरवठा अधिग्रहणाच्या रक्कमेचा मुद्दा सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी मांडला. यामुळे यंदाही कोणी अधिग्रहणास स्त्रोत देत नसल्याचे विठ्ठल चौतमल म्हणाले.
हा सगळा प्रकार घडत असताना राष्ट्रीयीकृत बँकेत का खाते ठेवले जात आहे, असा सवाल अंकुश आहेर, चौतमल, मनीष आखरे यांनी केला. यावर शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते ठेवावे लागते. जि.प. अधिनियमातील क.१३0 चा आधार घेत कॅफो डी.के.हिवाळे यांनी मध्यवर्ती बँकेत खाते काढण्यास विरोध दर्शविला. यानंतर सदस्यांनी मात्र तसा ठराव घेवून शासनाला पाठविण्याची मागणी केली. यात शेवटी क.१३0 मध्येही शासनाच्या परवानगीने सहकारी बँकेत खाते उघडता येते. त्यासाठी शासनाकडे परवानगी मागणारा ठराव पाठवा, असे अर्थ सभापती संजय देशमुख यांनी सांगितले. रात्री ९ वाजेपर्यंत सभा सुरूच होती.
प्रश्न अजूनही कायमच
हट्टा जि.प.शाळेतील अनुषंगिक कामे होत नसल्याची बाब मागील दोन वर्षांपासून मांडत असल्याचा आरोप करून जि.प.सदस्या रत्नमाला शिंदे यांनी हा विषय जवळपास एक ते दीड तास ताणला. यात प्रश्न-प्रतिप्रश्न करताना इतरही सदस्यांच्या उपप्रश्नामुळे प्रशासनच शेवटी निरुत्तर झाले होते. फेरसर्वेक्षण का केले? पूर्वी प्रशासकीय मान्यता दिल्यावर याची गरज काय? दिरंगाईवर कारवाई काय केली? हे प्रश्न भांडावून सोडणारे ठरले. जि.प. अध्यक्षांनीच दुसरेही प्रश्न असल्याने सीईओंकडे बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले.
नातेवाईकांचा हस्तक्षेप नकोे !
फकिरा मुंढे यांनी जि.प.सदस्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढल्याचा बॉम्बगोळा टाकून सर्वांनाच विचार करायला भाग पाडले. अनेक सदस्य-पदाधिकाºयांचे नातेवाईक येथे येतात. खुर्च्या बळकावतात. अधिकाºयांशी अरेरावी करतात. आम्ही सदस्य असताना नातेवाईकच आम्हालाही सामोरे जातात. अशांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. त्यावर खाजगी बैठक घेवून समजावू. तरीही न ऐकल्यास कारवाई होईल, असे सांगण्यात आले.