जीवन प्राधिकरणातही आता बांधकाम मुख्य अभियंते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:34+5:302021-08-14T04:22:34+5:30
बांधकाम अभियंत्यांना रस्ते, पूल, इमारती बांधणीचा अनुभव आहे. परंतु जीवन प्राधिकरणाचे काम वेगळे आहे. त्यामुळे बांधकामचे अभियंते प्राधिकरणात किती ...
बांधकाम अभियंत्यांना रस्ते, पूल, इमारती बांधणीचा अनुभव आहे. परंतु जीवन प्राधिकरणाचे काम वेगळे आहे. त्यामुळे बांधकामचे अभियंते प्राधिकरणात किती न्याय देतील, याबाबत शंका आहे. प्राधिकरणामध्ये आधीच रिक्त पदांचा माेठा अनुशेष आहे. त्यात थेट जनतेशी संबंध येणारा हा विभाग आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या निमित्ताने या विभागाला नागरिकांचे माेर्चे व तीव्र राेषाचा सामना करावा लागताे.
यादीत आणखी दाेघांचा समावेश
बांधकाम खात्यात मुख्य अभियंत्यांच्या १३ जागा रिक्त आहेत. तेवढ्याच लाेकांना पदाेन्नती दिली जाणार आहे. डीपीसीने मंजूर केलेल्या यादीत आता काेल्हापूर येथील अधीक्षक अभियंता माने यांचा दिव्यांग काेट्यातून समावेश झाला आहे, तर पुण्यातील पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता भालकर यांना मानीव दिनांक मंजूर झाल्याने त्यांचाही यादीत समावेश आहे.
चाैकट....
प्राधिकरणात कैद हाेणार काेण ?
सार्वजनिक बांधकाम खात्यातील कमी-अधिक ‘आर्थिक ग्लॅमर’ लक्षात घेता जीवन प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर जाऊन कैद हाेण्यास सहसा कुणीही तयार हाेणार नाही, असे मानले जाते. पदाेन्नती हेच टार्गेट असलेले आणि गाॅडफादर नसलेलेच या पर्यायाचा विचार करू शकतील, असे सांगितले जाते.