मरखेल येथे आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:03+5:302020-12-15T04:34:03+5:30
डॉ.स्वप्निल व्यंकटराव आढाव यांनी ६१ मेंदू रोग्यांची,डॉ.सुधाकर ताहाडे यांनी २६७ जणांची नेत्र तपासणी केली. यातील १६७ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया ...
डॉ.स्वप्निल व्यंकटराव आढाव यांनी ६१ मेंदू रोग्यांची,डॉ.सुधाकर ताहाडे यांनी २६७ जणांची नेत्र तपासणी केली. यातील १६७ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉ.अवधूत मोरे यांनी १६५ रुग्णांची केलेल्या तपासणीत एका गरीब महिलेला गँगरीन आजार असल्याचे निष्पन्न झाले.या महिलेची निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. ही तपासणी आठ तास चालली. यावेळी समुपदेश करण्यात आले. डॉ.प्रकाश झरीकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तपासणीनंतर आढाव पाटील हॉस्पिटल संचलित निर्मल हॉस्पिटलचे डॉ.स्वप्निल आढाव, डॉ.अवधूत मोरे, डॉ.सुधाकर ताहाडे, डॉ.प्रकाश झरीकर [सर्जन], जनसंपर्क अधिकारी किशनराव जंगमवाड, नागोराव शिंदे, अक्षय जंगमवाड, अविनाश रोडे, मधुकर वाघमारे, अजित राजूरकर आणि इतर कर्मचाऱ्यांचा व्यंकटराव पा.गोजेगावकर, बबन पा.गोजेगावकर, पंढरीरेड्डी चेपूरे, मधुकर रेड्डी यांचा शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रा. नागोराव तम्माजी उतकर यांनी करुन आभार मानले.