आरोग्य कर्मचारी बिनधास्त, पीपीई किटचा वापर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:21+5:302021-05-10T04:17:21+5:30
काय म्हणतात डॉक्टर्स जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पीपीई किट आहेत; परंतु पीपीई किट घातल्यानंतर डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास होत ...
काय म्हणतात डॉक्टर्स
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पीपीई किट आहेत; परंतु पीपीई किट घातल्यानंतर डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास होत आहे. काही वेळातच अंगातून घामाच्या धारा लागत आहेत. काहीजणांना अंगावर फोड येत आहेत. त्यामुळे वारंवार सूचना केल्यानंतरही अनेकजण पीपीई किट घालण्यास नकार देत आहेत.
- वैद्यकीय अधिकारी
बहुतांश रुग्णांना कोरोनाची लक्षणे कमी असतात. अशा वेळी पीपीई किट घातली नाही तरी चालून जाते. डबल मास्क वापरून रुग्णांची तपासणी करता येते; परंतु रुग्णाला तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास मात्र पीपीई किट घालूनच तपासणी करणे गरजेचे आहे.
काय म्हणतात आराेग्य कर्मचारी
मास्क आणि हँडग्लोव्हजचा वापर केल्यास संसर्ग होत नाही. त्यासाठी पीपीई किट घालावेच लागते. अशातील भाग नाही. सध्या पीपीई किटचा वापर बराच कमी झाला आहे.
- आरोग्य कर्मचारी
दिवसातून किती वेळा पीपीई किट घालायचे अन् काढायचे? काही वेळ घातल्यानंतरच अस्वस्थ वाटायला सुरुवात होते. सध्या लक्षणे कमी असलेले रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे पीपीई किट घालण्याची आवश्यकता वाटत नाही. गरज पडल्यासच ते घालतो.
- आरोग्य कर्मचारी
अंत्यसंस्कारांसाठी पीपीई किटचा वापर
अंत्यसंस्कार करण्यासाठी मात्र सर्वच जण पीपीई किटचा वापर करीत आहेत. महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांना पीपीई किट पुरविण्यात येतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर लगेच हे पीपीई किट काढून कर्मचाऱ्यांच्या अंगावर सॅनिटायझरचा फवारा मारला जातो.