नांदेड जिल्हा बँक प्रकरणाची सुनावणी १४ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:06 AM2018-10-13T01:06:08+5:302018-10-13T01:06:36+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आरोपींकडून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली़ यावेळी आरोपीच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात आली असून तक्रारदाराकडून युक्तिवादासाठी आता १४ नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे़ या प्रकरणात नऊ आरोपींकडून तीन पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत़

Hearing of Nanded District Bank case on 14th November | नांदेड जिल्हा बँक प्रकरणाची सुनावणी १४ नोव्हेंबरला

नांदेड जिल्हा बँक प्रकरणाची सुनावणी १४ नोव्हेंबरला

Next
ठळक मुद्देसाडेपाचशे कोटींचा घोटाळा : आरोपींकडून न्यायालयात पुनर्विचार याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आरोपींकडून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली़ यावेळी आरोपीच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात आली असून तक्रारदाराकडून युक्तिवादासाठी आता १४ नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे़ या प्रकरणात नऊ आरोपींकडून तीन पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत़
जिल्हा मध्यवर्ती बॅकेत २००० ते २००३ या काळात जवळपास साडेपाचशे कोटींचा गैरव्यवहार झाला होता़ नोकरभरती, संगणक खरेदी, नियमबाह्य इमारत भाडे, कमी किमतीत जुने वाहन विक्री, नियमबाह्य खरेदी, प्रचलित व्याजदरापेक्षा अधिक दराने ठेवी स्वीकारणे, नियमबाह्य जाहिराती, नियमबाह्य कर्जमंजुरी यासह एकूण २३ आरोप तत्कालीन संचालक मंडळावर ठेवण्यात आले होते़ लेखापरीक्षकांच्या अहवालात या बाबी उघड झाल्या होत्या़
त्यानंतर लेखापरीक्षकांनी तत्कालीन संचालक मंडळाकडून गैरव्यवहाराची ही रक्कम वसूल करावी, असे नमूद केले होते़ त्यानंतर दुसऱ्यांदा लेखापरीक्षण करण्यात आले़ त्यामध्ये मात्र लेखापरीक्षकांनी या सर्व संचालकांना क्लीनचिट दिली होती़ मध्यंतरी या प्रकरणाचा चेंडू सहकारमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याही कोर्टात गेला होता़ परंतु, सहकारमंत्र्यांनीही या संचालकांना पाठीशी घातल्याचा आरोप त्यावेळी तक्रारकर्त्यांनी केला होता़
दरम्यान, या प्रकरणात संभाजी पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ उच्च न्यायालयाने हे प्रकरण नांदेड न्यायालयाकडे पाठविले़ त्यानंतर न्यायालयाने तत्कालीन २५ संचालकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते़ परंतु आदेश पोलीस ठाण्यात पोहोचण्यास लागलेल्या विलंबाची संधी साधत तत्कालीन संचालकांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती़ पुनर्विचार याचिकेवर सुनावणीसाठी सुरुवातीला तक्रार संभाजी पाटील यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला होता़
त्यात शुक्रवारी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली होती़ शुक्रवारी आरोपीच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला़ जवळपास दीड तास आरोपीच्या वतीने वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला़ तक्रारदार संभाजी पाटील यांच्या वकिलांचा युक्तिवाद आता १४ नोव्हेंबरला होणार आहे़ दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींनी तीन पुनर्विचार याचिका दाखल केल्या असल्याची माहिती तक्रारदार पाटील यांनी दिली़

Web Title: Hearing of Nanded District Bank case on 14th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.