नांदेड जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी; बोधडीमध्ये २४ तासात १०१ मिमी पाऊस
By प्रसाद आर्वीकर | Published: August 19, 2023 11:42 AM2023-08-19T11:42:19+5:302023-08-19T11:42:29+5:30
पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने खरीप पिके धोक्यात आली होती.
नांदेड : वीस दिवसानंतर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असून, शुक्रवारी रात्री किनवट तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. बोधडी मंडळामध्ये २४ तासात १०१ मिलिमीटर पाऊस झाला.
पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. शनिवारी देखील सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. किनवट तालुक्यामध्ये रात्री पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्यातील सही मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे. २४ तासांमध्ये किनवट तालुक्यातील बोधडी मंडळात १०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच किनवट मंडळात ८१.३०, सिंदगी मंडळात ६९.८०, इस्लापुर ६६.८०, शिवणी ६५.८० आणि जलधारा मंडळात ६५.३०मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे.