नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; शिवणी मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:47 AM2020-07-23T11:47:43+5:302020-07-23T11:50:37+5:30

२४ तासात सर्वाधिक ५०.२९ मि.मी सरासरी पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे.

Heavy rains in Nanded district; Excessive rain in the Shivani circle | नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; शिवणी मंडळात अतिवृष्टी

नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; शिवणी मंडळात अतिवृष्टी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ४५ महसुल मंडळातही पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळीही नांदेड शहरासह जिल्हयाच्या विविध भागात पाऊस सुरू होता.

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी रात्री पासून दमदार पाऊस होत आहे. यात किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव आणि भोकर या  तालुक्यातील सर्व महसुल मंडळात मुसळधार पाऊस झाला असून किनवट तालुक्यातील शिवणी मंडळात अतिवृष्टी झाली आहे. येथे ९२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक ५०.२९ मि.मी सरासरी पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. किनवट  शहरात ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. माहूर तालुक्यात ४६.२५, हिमायतनगर ४३.६७, हदगाव २९.४३, भोकर २९.२५ तर मुदखेड तालुक्यात २१.३३ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील ४५ महसुल मंडळातही पावसाने हजेरी लावली आहे. महसुल मंडळनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे. इस्लापूर ५६, वानोळा ५४, सरसम ५३, जलधरा ५२, वाई ४८, बारड ४५, बोधडी ४४, सिंदखेड ४२, माहूर ४१, तळणी ४१, जवळगाव ४०, हिमायतनगर ३८, मोघाळी ३८, हदगाव ३७, सिंधी ३६, पिंपरखेड ३६, किनी ३३, आष्टी ३२, निवघा २६, देहली २४, भोकर २४, मातुळ २२ मांडवी २२,  तामसा १९, मनाठा १५, जारीकोट १३,धर्माबाद १२, मुगट ११, कुंटूर ११, वसरणी ११, पेठवडज १०,  लिंबगाव १०, वजीराबाद १०, नांदेड शहर १० मिलीमीटर तर ५ ते ९ मिलीमीटर दरम्यान मुदखेड, बरबडा, दाभड, नांदेड ग्रामीण, तरोडा, ऊमरी, गोळेगाव, कंधार मंडळात पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळीही नांदेड शहरासह जिल्हयाच्या विविध भागात पाऊस सुरू होता.

Web Title: Heavy rains in Nanded district; Excessive rain in the Shivani circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.