नांदेड जिल्हयातील दमदार पाऊस; कुरुळा मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:24 PM2020-07-20T12:24:38+5:302020-07-20T14:22:41+5:30
सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड : जिल्ह्यातील मुखेड,देगलूर, किनवट, कंधार तालुक्यात रविवारी दमदार पाऊस झाला. कंधारमधील कुरुळा मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
सर्वाधिक २५.५० मिमी सरासरी पाऊस देगलूर तालुक्यात झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. यात कंधार तालुक्यातील कुरूळा महसुल मंडळात ८० मिलीमीटर पाऊस झाला आहे.
किनवट तालूक्यातील मांडवी येथेही जोरदार पाऊस झाला असून तिथे ६४ मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टीच्या काठावर नोंद झाली आहे. शहापूर ४३, शिवणी ३५, जांब ३५, माळेगाव ३२, येवती ३०, देगलूर २८, किनी २८, सगरोळी २८, तामसा २४, मिरखेल २१, तर मातुळ मंडळात २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर १२ महसुली मंडळात १० ते २० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये जाहूर १८, खानापूर १८, माळाकोळी १६, आदमपूर १६, उस्माननगर १५, मुखेड १२, हदगाव १२, निवघा १२, आष्टी १२, लोहा ११, हानेगाव ११
तर हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात १० मिली मीटर ईतका पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे. तर अन्य ६५ मंडळात पावसाने उघडीप दिली होती. सोमवारी सकाळपर्यंत जिल्हयात सरासरी ३१३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ३७.२९ टक्के इतका आहे.
तालुक्यात आता सर्वाधिक पावसाची नोंद कुरूळा झाली आहे.एकूण कुरूळा ३०४ मि.मी. ,उस्माननगर २९३ ,फुलवळ २६१ ,कंधार २३७ ,पेठवडज २१७ व सर्वात कमी बारूळ २०३ मि.मी.झाली आहे.कुरूळा पावसाचे एकमेव कमी कालावधीत त्रिशतक मि.मी.पार करणारे ठरले. अतिवृष्टीमुळे शिवारात जिकडे तिकडे दलदल तयार झाली. सखल भागात सर्वत्र पाणी साचले. नदी ,नाले, तलावात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.विशेष म्हणजे गावालगत ऐतिहासिक हेमाडपंथी भवानी मंदिर (शिव पार्वती) आहे.मंदिरा जवळ तलाव आहे. यामध्ये असलेली गाळ काढल्याधे तलावाची खोली जास्त झाली आहे.तरी रात्री झालेल्या पावसामुळे तलाव तुडुंब भरला.
शेत शिवारात पाणी अधिक झाल्याने आता शेती कामाचा खोळंबा झाला आहे.पीके पाण्याखाली आली आहेत.त्यामुळे पाण्याचा वाफसा कधी होईल.असा प्रश्न निर्माण झाला आहे.दि.२० जूलै रोजी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.त्यामुळे सोयाबीन पीकाची पाने अगोदरच पिवळी पडत होती.औषधी फवारणी करून हिरवी पाने करण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते.त्याला मोठी खिळ बसली आहे.