नांदेड जिल्हयात जोरदार पाऊस; सहा मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:54 AM2020-07-10T11:54:43+5:302020-07-10T11:55:11+5:30
दहा महसूल मंडळात ६० मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला असून, आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ८० महसुल मंडळापैकी ६ महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर दहा महसूल मंडळात ६० मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हयात सरासरी २२.५४ मि.मी पाऊस झाला आहे. महसुल मंडळनिहाय विचार करता नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात सर्वाधिक ८५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्या खालोखाल हिमायतनगर तालुक्यातील सरसम ७७ मिली मीटर पाऊस झाला आहे. या पंधरवड्यात सरसम महसुल मंडळात तीसऱ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अन्य महसुल मंडळात पुढील प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. जलधरा ७३, जवळगाव ७२, तरोडा बुद्रुक ७०, बोधडी ६७, दाभड ६३, अर्धापूर ६२, नांदेड ग्रामीण ६२, तामसा ६१, हिमायतनगर ५५, मनाठा ४५, आष्टी ४४, मोघाळी ४०, मातुळ ४०, देहली ४०, शिवणी ३५, वजीराबाद ३८, इस्लामपूर ३७, वानोळा ३६, मांडवी ३६, हदगाव ३३, तुप्पा ३१, वसरणी ३०, बारड ३०, विष्णुपूरी २९, वाई २८, मुगट २७, नांदेड शहर २६, मुदखेड २५, पिंपरखेड २४, निवघा २४, किनवट २२, मालेगाव २२,तळणी २० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हयात आजवर एकूण २५८.८४ मि.मी. पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या २९.०४ मि.मी इतका आहे. जिल्ह्यातील अन्य ४५ महसूल मंडळात चांगल्या पावसाची प्रतिक्षा असली तरी समाधानकारक पावसामुळे बळीराराजा सुखावल्याचे चित्र आहे.