उमरी तालुक्यात मुसळधार पाऊस, गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे ६ दरवाजे उघडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:10 PM2018-08-20T14:10:48+5:302018-08-20T14:12:16+5:30

आज सकाळपर्यंत तालुक्यात ६३ मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे . 

Heavy rains in Umari taluka; 6 doors of Godavari Bandhara are opened | उमरी तालुक्यात मुसळधार पाऊस, गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे ६ दरवाजे उघडले 

उमरी तालुक्यात मुसळधार पाऊस, गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे ६ दरवाजे उघडले 

Next

उमरी (नांदेड) : संपूर्ण तालुक्यात रविवारी (दि.१९ ) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज सकाळपर्यंत तालुक्यात ६३ मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे . 

या पावसामुळे तालुक्यातील छोट्या-मोठ्या नदी - नाल्यांना पूर आला आहे. ग्रामीण भागातील काही पुलावरून पाणी वाहत असल्याने या भागातील वाहतूक प्रभावित झाली. 

रविवारी रात्रभर व सोमवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीतील पाण्यात वाढ झाली आहे. बळेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Web Title: Heavy rains in Umari taluka; 6 doors of Godavari Bandhara are opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.