शेतकऱ्याच्या मुलीची वरात अन् पाठवणीही हेलिकॉप्टरने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:28 AM2020-02-17T05:28:46+5:302020-02-17T05:29:20+5:30

आठ लाख खर्च : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील पित्याने केली कन्येची इच्छा पूर्ण

The helicopter also sent the farmer's daughter and his wife | शेतकऱ्याच्या मुलीची वरात अन् पाठवणीही हेलिकॉप्टरने

शेतकऱ्याच्या मुलीची वरात अन् पाठवणीही हेलिकॉप्टरने

googlenewsNext

नांदेड : विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण़ लग्नसोहळा भव्य-दिव्य व्हावा यासाठी अर्धापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने लेकीच्या लग्नात वरात अन् पाठवणीसाठी चक्क हेलिकॉप्टर बुक केले होते़ रविवारी कोंढा गावी हा लग्नसोहळा झाला.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावचे सरपंच असलेल्या रामराव बाबूराव कदम यांची बहीण शिल्पा कदम हिचा विवाह उखळीचे मोहन गायकवाड यांच्याशी झाला. बहिणीच्या इच्छेप्रमाणे लग्नात वरात आणि पाठवणीसाठी त्यांनी आठ लाख रुपये खर्च केले. कोंढा गावातून मंगल कार्यालयापर्यंत नववधूला हेलिकॉप्टरने आणण्यात आले़ पाठवणीही हेलिकॉप्टरने केली.

आम्ही कधी मुलगा, मुलगी असा फरक केला नाही़ मुलीचे स्वप्न साकार करण्याचे मनात ठरविले होते़ मी एक शेतकरी असून मुलीची इच्छा पूर्ण केली़ आमच्या परिसरात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी आहे़ त्यामुळे ऊस, हळद यासारखी पिके चांगली येतात़ त्यामुळे उत्पन्नही चांगले होते़
- नारायण कदम, वधूचे वडील

मला अभिमान आहे मी एका शेतकºयाची लेक आहे़ शेतकरी म्हटले की कष्ट आलेच़ माझे वडील-भाऊ यांनी आजपर्यंत मला खूप दिले़ माझं स्वप्न होते की हेलिकॉप्टरमध्ये बसायचे़ ते स्वप्न आज साकार झाले़
- शिल्पा कदम, नववधू

नववधूची पाठवणी :
नववधू आणि वराची औंढा तालुक्यातील उखळी येथे हेलिकॉप्टरने पाठवणी करण्यात आली़

Web Title: The helicopter also sent the farmer's daughter and his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.