शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:33+5:302021-02-20T04:50:33+5:30
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार हजारो नांदेडकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होताना नांदेडकरांमध्ये स्फूर्तिदायक वातावरण निर्माण ...
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार हजारो नांदेडकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होताना नांदेडकरांमध्ये स्फूर्तिदायक वातावरण निर्माण झाले होते आणि प्रत्येकाच्या माना अभिमानाने उंचावल्या होत्या.
दुपारी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने अभिवादन करण्यासाठी उपस्थित शिवप्रेमी बांधवांसाठी अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, मारोती पाटील शनखातीर्थकर,अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर, स्वागताध्यक्ष धनंजय पाटील, प्रकाशराव पवार पाथरडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आला वाटप झाले. हजारो नागरिकांनी यावेळी अन्नदानाचा लाभ घेतला.
यशस्वितेसाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी भागवत देवसरकर, पीयूष शिंदे, शंकर पवार निवघेकर,रवी ढगे, डॉ. प्रशांत तावडे, परमेश्वर काळे, प्रा. दिलीप शिरसाठ प्रा. प्रभाकरराव जाधव मोतीराम पवार, विजय देशमुख, बालाजी इंगळे, पाटील, वैभव कल्याणकर, विजय पाटील, शिंदे संदीप पावडे, शुभम चव्हाण, सुनील ताकतोडे, अनिकेत मिलगिरे, उद्धव पाटील तिडके, गजानन उबाळे यांच्यासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.