बिलोली पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपींचे गुन्हे रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:15 PM2018-01-09T17:15:05+5:302018-01-09T17:15:29+5:30
चार महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशान्वये बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांपैकी अद्याप दोन आरोपी फरारच आहेत़ दरम्यान, पालिकेचे सल्लागार अभियंता भास्कर शिंदे न्यायालयीन कोठडीत असून तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके व सेवानिवृत्त लेखापाल शंकर जाधव यांच्यावरील गुन्हा रद्द ठरवण्यास उच्च न्यायालयाने ४ जानेवारी रोजी नकार दिला़.
बिलोली (नांदेड ) : चार महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशान्वये बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांपैकी अद्याप दोन आरोपी फरारच आहेत़ दरम्यान, पालिकेचे सल्लागार अभियंता भास्कर शिंदे न्यायालयीन कोठडीत असून तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके व सेवानिवृत्त लेखापाल शंकर जाधव यांच्यावरील गुन्हा रद्द ठरवण्यास उच्च न्यायालयाने ४ जानेवारी रोजी नकार दिला़.
येथील पालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी चार महिन्यांपूर्वी बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला़ सर्व पाच आरोपींनी जामिनासाठी कनिष्ठ सत्र व उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली; पण कुठेही अटकपूर्व जामीन मिळाला नाही़ अखेर पाचपैकी तिघे आरोपी पोलिसांत शरण आले़ प्रारंभी पोलीस व नंतर न्यायालयीन अटकेनंतर नगराध्यक्ष मैथिली कुलकर्णी व लिपीक गफूर कुरेशी यांना जामीन मिळाला, परंतु अभियंता भास्कर शिंदे यांचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे़ तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके व शंकर जाधव यांना अद्याप कोणत्याही न्यायालयाकडून अभय मिळाले नाही़ पोलीस नोंदीनुसार दोघे आरोपी अजूनही फरारच आहेत़ डोके यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज यापूर्वीच उच्च न्यायालयातून परत घेतला.
सध्या डोके हे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पालिकेत कार्यरत आहेत़ तर मूळचे मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील रहिवासी आहेत़ दोन्ही ठिकाणी पोलिसांचे पथक तीन वेळा जावून आले, अशी माहिती पो़नि़ भगवान धबडगे यांनी दिली़ कोणत्याच न्यायालयाने दोन आरोपींना अभय दिले नसल्याने पोलीस तपास करीत आहेत़;पण अद्याप काहीच ठावठिकाणा लागला नाही. जानेवारी रोजी उच्च न्यायालयातही न्या.पी.बी़. वारले, न्या.व्ही.व्ही. कनकनवाडी यांनी गुन्हा रद्द करण्याच्या अर्जावर मुभा दिली नाही़
पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात
पालिकेचे सल्लागार अभियंता भास्कर शिंदे न्यायालयीन कोठडीत असून तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके व सेवानिवृत्त लेखापाल शंकर जाधव यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने ४ जानेवारी रोजी नकार दिला़ या आरोपींच्या शोधात पोलीस आहेत़