महामार्गाचे काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:55 AM2019-04-29T00:55:00+5:302019-04-29T00:55:47+5:30
किनवट-भोकर-मुदखेड-नांदेड या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग या राष्ट्रीय महामार्ग क्ऱ १६१ ए़ हिमायतनगर - कोठारी या रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन व धिम्या गतीने होत आहे.
किनवट : किनवट-भोकर-मुदखेड-नांदेड या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग या राष्ट्रीय महामार्ग क्ऱ १६१ ए़ हिमायतनगर - कोठारी या रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन व धिम्या गतीने होत आहे.काम पूर्ण केव्हा होणार असा सवाल धुळीमुळे त्रस्त झालेले प्रवासी वाहनचालक विचारत आहेत़ याच मार्गावर काही ठिकाणी कामाला सुरुवात नसल्याचे दिसून येत आहे़ सबग्रेड (मुरुम भराव) च्या कामा -पलीकडे काही काम सरकता सरकत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
मोठा गाजावाजा करून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला़ त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली़ कामही गुतेदाराला मिळाले़ मात्र ज्या गुत्तेदाराला हे काम मिळाले त्याने सब एजन्सीला काम देऊन मोकळे होत कामाची वाट लावली आहे़ सुरू असलेल्या कामावर देखरेख नाही़ मुरूम लेअरवाईज टाकणे, पाणी शिंपडणे, दबई करणे या कामाचा अभाव असून कुठे चढ कुठे खड्डा, कुठे उतार चढाव अशी स्थिती असून एकदाच काम सुरू करून वाहन चालकांना त्रासून टाकले आहे़ या कामावर कुठेच डायव्हर्शन दिसत नाही़ सध्या लगीनघाई सुरू आहे़ हिमायतनगर ते किनवटला यायचे झाल्यास पांढरेशुभ्र कपडे घालून निघालेल्या वºहाडी मंडळींना धुळीमुळे काळे पांढरे व्हावे लागत आहे़
या मार्गावर नळकांडी बनवली नाही़ परिणामी पावसाळ्यात हा मार्ग वाहनचालक व प्रवाशांना डोकेदुखी ठरणार आहे़ कामाला सुरुवात झाली तेव्हापासूनच काम दर्जाहीन होत असल्याची ओरड सुरू झाली़ मात्र संबंधितांना काम करून घ्यायची घाई झाली अन् इकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, ही चिंतेची बाब आहे़ बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराला दबाई खाली टाकू असा गर्भित इशारा भूमिपूजन कार्यक्रमात वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता़ मात्र सरसम (बु़) ते कोठारी मार्गाचा ठेका घेणाºया गुत्तेदारावर याचा परिणाम झाला नाही यास काय म्हणावे? राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामावर हजर नसतात़ त्यामुळे कामाची वाईट परिस्थिती दिसून येत आहे़ सबग्रेडच्या पुढे काम सरकले नाही़ या कामांवर वळण मार्ग किंवा काम सुरु असल्याचे फलक न लावल्याने रेडियमच्या फलकाअभावी रात्रीला काम कुठे सुरू आहे हे समजत नसल्याने वाहनधारक गोंधळात पडत आहेत़
कामाला गती देण्याबाबत संबंधितांना वारंवार बोलूनही कामाला अजिबात गती नाही व दर्जा नाही़ केवळ खोदकाम व मुरुमभराव सबग्रेड या कामातच वेळ घातला जात आहे़ त्यात धरसोड पद्धतीचा अवलंब यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास केव्हा जाणार? असा सवाल या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालक विचारत आहेत़ छोटे- मोठे पुलाच्या कामाला तर अद्यापही सुरुवातच झाली नाही.
याबाबत मॅनेजमेंट सल्लागार दत्तात्रय पावसे यांनी सांगितले, येत्या काळात कामाला गती देण्याची ग्वाही संबंधितांनी दिली असून हिमायतनगर जवळ दहा किमी अंतराचे काँक्रेटचे काम हाती घेतले आहे़ सध्या उन्हाळा आहे़ त्यामुळे पाण्याअभावी सबग्रेडचे काम थांबविण्याच्या सूचना दिल्या असून पावसाळ्यात काँक्रेटच्या कामाला गती मिळेल़
हिमायतनगर ते कोठारी मार्ग त्रासदायक
राज्यात व त्यातल्या त्यात धनोडा ते कोठारी या मार्गावर शिस्तीने व नियोजनबद्ध काम सुरू आहे़ डायव्हर्शन व रेडियम लावलेले फलक जागोजागी दिसतात़ पण हिमायतनगर ते कोठारी या कामावर त्याचा अभाव दिसून येत आहे़ त्यामुळे हिमायतनगर ते कोठारी हे काम राष्ट्रीय महामार्गाचे की पाणंद रस्त्याचे हेही समजायला मार्ग नाही़
धरसोड पद्धतीने होणा-या कामामुळे या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालक कंटाळवाणे झाले आहेत़