कर्णकर्कश हॉर्नला सर्वसामान्यांसह वृद्धही वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:05+5:302021-06-26T04:14:05+5:30

नांदेड शहरात लाॅकडाऊन कालावधीत नियम तोडणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेने मोठ्या संख्येने कारवाई केली. त्यापूर्वी फटाक्याचा आवाज करणाऱ्या हजारावर बुलेट ...

The hoarse horn annoyed everyone, including the elderly | कर्णकर्कश हॉर्नला सर्वसामान्यांसह वृद्धही वैतागले

कर्णकर्कश हॉर्नला सर्वसामान्यांसह वृद्धही वैतागले

Next

नांदेड शहरात लाॅकडाऊन कालावधीत नियम तोडणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेने मोठ्या संख्येने कारवाई केली. त्यापूर्वी फटाक्याचा आवाज करणाऱ्या हजारावर बुलेट जप्त करून त्यांचे सायलेन्सर काढून टाकून दीड ते दोन हजार रुपयांचा दंडही प्रत्येकाकडून वसूल करण्यात आला. परंतु, मागील दीड वर्षापासून काही प्रमाणात लाॅकडाऊन सुरूच होता. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीही कमी होती. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून गर्दीसह स्टंट अन् कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीही वाढल्या आहेत.

कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...

कर्णकर्कश हाॅर्न वाजवून सामान्य नागरिकांना त्रास दिल्यास कारवाई होते.

कलम ११९ / ११७ नुसार कारवाई करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करता येते.

शहरातील अनेक प्रतिबंधित क्षेत्रात हाॅर्न वाजवून नागरिकांना विनाकारण त्रास दिला जातो.

प्रतिबंधित क्षेत्रात हाॅर्न वाजविणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येतो.

कारवाई मोहीम सुरूच

आजघडीला बाजारपेठेतील गर्दी वाढली असून, वाहनधारकांना शिस्त लावण्याचे काम सुरू आहे. नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, कर्णकर्कश आवाजासह फॅन्सी नंबर वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाते. त्यांच्याकडून वेळीच दंड वसूल केला जातो अथवा वाहन जप्त केले जाते. - चंद्रशेखर कदम,

पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: The hoarse horn annoyed everyone, including the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.