नांदेड जिल्हा कचेरीसमोर बजेटची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:27 AM2018-02-03T00:27:20+5:302018-02-03T00:27:32+5:30

अर्थसंकल्पात मोदी सरकारने योजना कर्मचा-यांना एक पैसाही न देता उलट आरोग्य व शिक्षणावर कर लादल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक बजेटची होळी करण्यात आली़ यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली़

Holi budget for Nanded District Cacheri | नांदेड जिल्हा कचेरीसमोर बजेटची होळी

नांदेड जिल्हा कचेरीसमोर बजेटची होळी

googlenewsNext
ठळक मुद्देमार्क्सवादी कम्युनिस्टचे आंदोलन : सरकारविरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अर्थसंकल्पात मोदी सरकारने योजना कर्मचा-यांना एक पैसाही न देता उलट आरोग्य व शिक्षणावर कर लादल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक बजेटची होळी करण्यात आली़ यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली़
आरोग्याच्या क्षेत्रात काम करणा-या आशा वर्करच्या मानधनात या अर्थसंकल्पात एक रुपयांचीही वाढ करण्यात आली नाही़ या उलट सरकारने स्वत:च्या वेतनात मात्र घसघशीत वाढ केली आहे़ हे सरकार निजामाचे वारसदार असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉ.विजय गाभणे यांनी केली़
शालेय पोषण आहार, असंघटित कामगार, शेतकरी, गरीब, मध्यमवर्ग, महिला, कर्मचारी, बेरोजगार, विद्यार्थी, युवक, छोटे व्यापारी या सर्वांसाठी बजेट अत्यंत निराशाजनक आहे़ सरकार या बजेटद्वारे शेतक-यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवू पाहत आहे़ शेतकरी आणि गरिबांबाबत खोटी आकडेवारी सरकारकडून सांगण्यात येत आहे़ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दलित आदिवासींना मिळणा-या हक्काच्या निधीवरही डल्ला मारला असून एससी, एसटीमधील ७५ हजार कोटी रुपये मोदी सरकारने पळविले आहेत़ आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्राचे व्यापारीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक बजेटची होळी करुन आपला निषेध नोंदविला़ आंदोलनाला कॉ़ गंगाधर गायकवाड, कॉ़उज्ज्वला पेडलेवार, कॉ़धोंडगीर गिरी, कॉ़ माधव मोतेवार, ललिताबाई गजभारे, बालाजी कलेटवाड, नागोराव कमलाकर, संतोष साठे, बालाजी गवळकर, कांताबाई दोडके, शारदा ससाणे, वंदना गोडबोले, जयश्री मोरे, रमेश खरंबे यांची उपस्थिती होती़

Web Title: Holi budget for Nanded District Cacheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.