१५ जुलैपासून होमगार्ड भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:24 AM2019-06-28T00:24:30+5:302019-06-28T00:25:05+5:30
जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील १८३ पुरुष व १७९ महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी नावनोंदणी १५ जुलै ते १७ जुलै या कालावधीत पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे करण्यात येणार आहे.
नांदेड : जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील १८३ पुरुष व १७९ महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी नावनोंदणी १५ जुलै ते १७ जुलै या कालावधीत पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे करण्यात येणार आहे.
नांदेड पथकात- १०० पुरुष व ५५ महिला, बिलोली- १७ पुरुष व २७ महिला, हदगाव- १६ पुरुष २६ महिला, मुखेड- ४ पुरुष १४ महिला, देगलूर- ८ पुरुष ७ महिला, कंधार- २३ पुरुष २४ महिला, किनवट- ५ पुरुष, १४ महिला, भोकर- १० पुरुष १२ महिला या होमगार्डच्या रिक्त पदांसाठी ही नावनोंदणी करण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी वयोमर्यादा २० ते ५० वर्षे असून किमान दहावी उत्तीर्ण असावा. पुरुषांसाठी उंची १६२ सें.मी किमान, छाती न फुगवता ७६ सेंमी आणि फुगवून ८१ सेंमी असावी. १ हजार ६०० मीटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणी अनिवार्य असून उमेदवार सुशिक्षित बेरोजगार नसावा. महिलांसाठी उंची किमान १५० सेंमी असावी. ८०० मीटर धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारास प्रत्येक प्रकारात कमीत कमी ४० टक्के गुण आवश्यक राहतील. याव्यतिरिक्त आयटीआय प्रमाणपत्र, खेळाचे कमीत-कमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, एनसीसी बी किंवा सी प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र, जड वाहन चालविण्याचा परवाना या प्रमाणपत्रधारकांना तांत्रिक अर्हता गुण दिल्या जातील.
१५ जुलै शारिरिक, १६ रोजी मैदानी चाचणी
पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सोमवार, १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून नावनोंदणी करण्यात येईल. सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या पुरुष / महिला उमेदवारांची मैदानी चाचणी मंगळवार, १६ जुलै रोजी पहाटे ५ वा. शहीद भगतसिंघ चौक, असर्जन नाका विष्णूपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.