आशा, गटप्रवर्तकांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:10+5:302021-06-24T04:14:10+5:30

या आंदोलनामध्ये कॉ.विजय गाभणे व सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे ...

Hopefully, the group promoters are clapping | आशा, गटप्रवर्तकांचा थाळीनाद

आशा, गटप्रवर्तकांचा थाळीनाद

Next

या आंदोलनामध्ये कॉ.विजय गाभणे व सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे आणि साहेबराव धनगे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार आशांना दरमहा १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये मानधन देण्यात यावे. नांदेड शहरात व जिल्ह्यात जनसंख्येच्या आधारावर तातडीने नवीन भरती करावी व गटप्रवर्तक पदासाठी आशांना प्राधान्य देण्यात यावे. गटताईंचा गणवेश कलर बदलण्यात यावा. ग्रामपंचायतीकडून मिळणारा दरमहा कोविड भत्ता देण्यात यावा, आशा व गटताईंना प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात मंजूर असलेला कक्ष देण्यात यावा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानामध्ये आशांनी सर्वेक्षणाचे काम केले आहे त्या कामाचा मोबदला देण्यात आलेला नाही तो तात्काळ देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी कॉ. शीलाताई ठाकूर, कॉ. सारजा कदम, कॉ. वर्षा सांगडे, जयश्री मोरे, सुनीता पाटील, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. शेख मगदूम पाशा, द्रोपदा पाटील, रेखा धुतडे, शरयू कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Hopefully, the group promoters are clapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.