आडवे ऑक्सिजन सिलिंडर उभे; प्रशासकीय यंत्रणा कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:05 PM2020-09-09T13:05:50+5:302020-09-09T13:13:18+5:30

याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुसऱ्याच दिवशी आडवे असलेले ऑक्सिजन सिलिंडर उभे करण्यात आले असून पाईपलाईनद्वारे जोडणीही सुरू झाली आहे़.

Horizontal oxygen cylinder vertical; The administrative system worked | आडवे ऑक्सिजन सिलिंडर उभे; प्रशासकीय यंत्रणा कामाला

आडवे ऑक्सिजन सिलिंडर उभे; प्रशासकीय यंत्रणा कामाला

Next
ठळक मुद्दे दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय असताना केवळ ऑक्सिजन नसल्यामुळे या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यात येत नव्हते़ दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या दोनशे खाटांच्या रुग्णालयात केवळ पाचच रुग्ण दाखल

- शिवराज बिचेवार

नांदेड :  श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय असताना केवळ ऑक्सिजन नसल्यामुळे या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यात येत नव्हते़ तर दुसरीकडे बेड मिळत नसल्याने सर्वच रुग्णालयांत रुग्ण वेटिंगवर आहेत़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुसऱ्याच दिवशी आडवे असलेले ऑक्सिजन सिलिंडर उभे करण्यात आले असून पाईपलाईनद्वारे जोडणीही सुरू झाली आहे़ 

दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या दोनशे खाटांच्या रुग्णालयात केवळ पाचच रुग्ण दाखल असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती़ त्यानंतर तातडीने हालचाली करीत दुसऱ्याच दिवशी १३ हजार किलो क्षमतेचा आडवा असलेला ऑक्सिजन सिलिंडर उभा करण्यात आला़ या सिलिंडरपासून रुग्णालयातील प्रत्येक बेडपर्यंत पाईपलाईनद्वारे आॅक्सिजन पुरवठा करण्याच्या कामालाही गती आली आहे़ त्यामुळे लवकरच या ठिकाणी रुग्णांना दाखल करता येणार आहे़ तर दुसरीकडे विष्णूपुरी येथील रुग्णालयातील कोरोना कक्षांची अधिष्ठाता डॉ़ सुधीर देशमुख यांनी पाहणी केली़ या ठिकाणी आणखी दोन कोरोना कक्ष उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या़ 

रेमडेसिवीरसाठी आता वणवण
कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांना सध्या रेमडेसिवीर हे इंजेक्शन अत्यंत आवश्यक आहे़ खाजगी कोविड सेंटरच्या काही औषधी दुकानात ते उपलब्ध आहेत़ तर काही ठिकाणी स्टॉक संपला आहे़ त्यामुळे हे इंजेक्शन आणण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांवरच टाकली आहे़ इंजेक्शनच्या शोधात नातेवाईकांची मात्र चांगलीच फरपट होत आहे़ ६ इंजेक्शनसाठी तब्बल ३२ हजार ४०० रुपये मोजावे लागत आहेत़ नांदेडातील एकाही खाजगी रुग्णालयात आणि दोन्ही शासकीय रुग्णालयांत सध्या खाटाच उपलब्ध नसल्यामुळे वेटिंगवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे़ एकट्या विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी तब्बल १५ रुग्ण खाट मिळण्याच्या प्रतीक्षेत होते़ जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयातील संख्या तर त्याहून अधिक आहे.

Web Title: Horizontal oxygen cylinder vertical; The administrative system worked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.