ईडीच्या धसक्याने ‘टांगा पलटी घोडे फरार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:06+5:302021-06-28T04:14:06+5:30

१८ जुलै २०१८ रोजी तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मीणा यांच्या पथकाने सापळा रचून शासकीय धान्याचा काळाबाजार होत असताना दहा ...

'Horses run away' | ईडीच्या धसक्याने ‘टांगा पलटी घोडे फरार’

ईडीच्या धसक्याने ‘टांगा पलटी घोडे फरार’

Next

१८ जुलै २०१८ रोजी तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मीणा यांच्या पथकाने सापळा रचून शासकीय धान्याचा काळाबाजार होत असताना दहा ट्रक पकडले होते. या ट्रकमध्ये शासकीय वितरण व्यवस्थेचा शिक्का असलेली सहा हजार पोती आढळून आली होती. हे सर्व ट्रक कृष्णूर येथील इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीत गेली होती. या प्रकरणात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केला. हसन यांनी अत्यंत बारकाईने हे पुरावे गोळा केले. त्यात धान्य व्यापारी, पुरवठादार, शासकीय अधिकारी यांच्यासह अनेकांचा सहभाग आढळला. त्यांनतर हर्सूल कारागृहात असताना त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. या प्रकरणात तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे फरार आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक ईडीने या प्रकरणात एन्ट्री घेतली. अजय बाहेती यांना अटक करून आठ दिवसांची कस्टडी सुनावली. त्यामुळे घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. ईडीचा फास आणखी किती जणांवर आवळला जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणारच आहे. परंतु यातील काही आरोपी मात्र भूमिगत झाल्याची चर्चा आहे.

धान्याचा काळाबाजार तरीही सुरूच

राज्यभरात कृष्णूरच्या घोटाळ्याने नांदेडची बदनामी झाली. पोलिसांनी जोरदार कारवाई करून अनेकांना अटक केली. त्यामुळे धान्याचा काळाबाजार थांबेल अशी अपेक्षा होती. परंतु धान्याच्या काळाबाजारात नवीन पिढी उतरली आहे. नांदेड ग्रामीण भागात यातील काही जणांचे गोदाम असून त्या ठिकाणाहून धान्याची विल्हेवाट लावली जाते अशी माहिती आहे.

Web Title: 'Horses run away'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.