वर्षात ३६ बाळांतपणे करायची कशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:43 AM2018-08-22T00:43:50+5:302018-08-22T00:44:19+5:30
कंत्राटी कर्मचारी म्हणून अवघ्या आठ, नऊ हजारांवर काम करीत आहोत़ अल्पसे वेतन तेही वेळेवर मिळत नाही़ आज २१ तारीख उजाडली. तरीही जुलैचे वेतन मिळालेले नाही़ दुसरीकडे उद्दिष्टावर उद्दिष्टे दिली जात आहेत़ कामाचा परफॉर्मन्स डिलीव्हरी केसेस किती केल्या त्यावर ठरविले जाते़ गावाची लोकसंख्या असो नसो वर्षाला ३६ बाळांतपणाचे उद्दिष्ट आहे़ ते पूर्ण करायचे कसे? असा उद्विग्न सवाल कंत्राटी कर्मचाऱ्याने उपस्थित केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कंत्राटी कर्मचारी म्हणून अवघ्या आठ, नऊ हजारांवर काम करीत आहोत़ अल्पसे वेतन तेही वेळेवर मिळत नाही़ आज २१ तारीख उजाडली. तरीही जुलैचे वेतन मिळालेले नाही़ दुसरीकडे उद्दिष्टावर उद्दिष्टे दिली जात आहेत़ कामाचा परफॉर्मन्स डिलीव्हरी केसेस किती केल्या त्यावर ठरविले जाते़ गावाची लोकसंख्या असो नसो वर्षाला ३६ बाळांतपणाचे उद्दिष्ट आहे़ ते पूर्ण करायचे कसे? असा उद्विग्न सवाल कंत्राटी कर्मचाऱ्याने उपस्थित केला़
मंगळवारी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठवाडा विकास मंडळ यांच्या पुढाकाराने जिल्हा आरोग्य संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होत़ बैठकीला मराठवाडा विकास मंडळाचे डॉ़ अशोक बेलखोडे यांच्यासह डॉ़व्यंकटेश काब्दे, जिल्हा आरोग्य अधिकारी झिने, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ कदम आदींची उपस्थिती होती़
या बैठकीत उपस्थित अधिकाºयांनी आरोग्य कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या़ यावेळी डॉ़ बेलखोडे यांनी कर्मचाºयांना बोलते केले़ आरोग्य विभागाचे काम करीत आहोत़ मात्र बोंडअळीच्या पाहणीसाठीही उशिरापर्यंत थांबावे लागते़ अशी व्यथा एका महिला परिचारिकेने मांडली़ मुख्यालयी थांबा असे आदेश सारखे बजावले जातात़ मात्र मुख्यालयी शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नाहीत़ मग आमच्या लेकरांनी शिकायचे नाही का ? असा सवाल ही यावेळी या परिचारिकेने केला़
यावेळी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या महिला कर्मचाºयाने आपली व्यथा मांडली़ बाळांतपणाचे उद्दिष्टे आम्हाला देण्यात आले आहेत़ महिन्याला ३ बाळांतपण केलीच पाहिजेत, असे उद्दिष्ट आहे़ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही दारोदार फिरुन आमचे उपकेंद्र कसे चांगले आहे़ तेथे कशा सुविधा आहेत़ याची माहिती देत फिरतो़ मात्र आमच्या अडचणींकडे कुणीच पाहत नाही़ तुटपुंज्या वेतनावर काम करताना अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान, वाहनचालकांनी १०८ आणि १०२ या वाहनासंबंधीची गाºहाणी मांडली़ यातील अनेक वाहने नादुरुस्त आहेत़ मात्र त्यानंतरही स्वत:च्या जबाबदारीवर पेशंटला घेवून जावे लागते़ किरकोळ आजाराच्या रुग्णासाठीही गाड्याचा वापर होत असल्याची तक्रारही यावेळी त्यांनी केली़
----
संघटितपणे समस्या मांडा
मराठवाडा विकास मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हा आरोग्य संवाद बैठकीत डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ कर्मचाºयांच्या समस्या गंभीर आहेत याची जाण आहे़ मात्र केवळ पगारीसंबंधीच्या तक्रारी न करता इतर तक्रारीही कर्मचाºयानी संघटितपणे मांडाव्यात़ कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़