आधार कार्ड नसलेल्यांनी कोरोनाची लस घ्यायची तरी कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:39+5:302021-03-27T04:18:39+5:30
बहुतेक बेघर असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या आजाराचं प्रमाण अधिक दिसून येतं. या लोकांना लस देणं गरजेचं आहे. मात्र, लसीकरणाच्या ऑनलाइन ...
बहुतेक बेघर असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या आजाराचं प्रमाण अधिक दिसून येतं. या लोकांना लस देणं गरजेचं आहे. मात्र, लसीकरणाच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये आधार कार्ड अनिवार्य असून, आधार कार्ड नसल्यास कुठला पुरावा किंवा ओळखपत्र वापरावे, या संदर्भात प्रशासनाकडे गाइडलाइन नाहीत. त्यामुळे अशा लोकांचे लसीकरण कसे केले जाईल, त्यांना कोरोनाची लागण होणार नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आधार कार्ड नसणाऱ्यांनी करायचे काय?
परिसरामध्ये असंख्य भिक्षेकरु वास्तव्याला असून, ते शहराच्या विविध भागांमध्ये फिरून ते दिवस काढत आहेत. मिळेल ते खाणे, रस्त्याच्या कडेला झोपणे, स्वच्छतेचा अभाव अशा अनेक समस्या त्यांच्या आहेत. त्यांच्याकडे आधार कार्डही नाही, मग त्यांनी करायचे काय, असा प्रश्न सध्यातरी भेडसावत आहे.
कोट
राज्यात सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोना विरोधात लसीकरण हा महत्त्वाचा रामबाण उपाय असून, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशांचाही विचार व्हायला पाहिजे.
- शुभम कारेवार, सामाजिक कार्यकर्ते