आणखी किती दिवस अभ्यास करायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:08 AM2021-05-04T04:08:55+5:302021-05-04T04:08:55+5:30
चौकट - जिल्ह्यातील ३२ हजार १८५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षेसोबत वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधि आदी व्यावसायिक अभ्याक्रमांसाठी ...
चौकट - जिल्ह्यातील ३२ हजार १८५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षेसोबत वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधि आदी व्यावसायिक अभ्याक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्वपरीक्षासुद्धा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या सर्व परीक्षांचा अभ्यास आणखी किती दिवस करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विविध प्रवेश पूर्व परीक्षा व बारावीच्या परीक्षा या दोन्ही परीक्षांचा ताण विद्यार्थ्यांनी किती दिवस घ्यायचा याही काही मर्यादा निश्चित झाल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.
चौकट- बारावीच्या परीक्षेच्या निकालावर पदवी अभ्याक्रमाचे प्रवेश अवलंबून असतात तसेच बारावीत मिळालेल्या गुणांचा विचार करून काही विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, याबाबत निर्णय घेतात. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात शासनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
- प्रा. धाराशिव शिराळे, शिक्षणतज्ज्ञ, नांदेड.