सध्या पीएम केअर्स फंडात किती रक्कम आहे शिल्लक? ऑडीटनंतरच्या आकडेवारीने अवाक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:10 PM2022-12-22T12:10:09+5:302022-12-22T12:12:49+5:30

लेखापरिक्षणानंतर आकडेवारी जाहीर, पीएम केअर्स फंडातील निधी काेराेना काळात सर्वाधिक खर्च झाला

How much is left in PM CARES fund? You will be stunned by the statistics after the audit | सध्या पीएम केअर्स फंडात किती रक्कम आहे शिल्लक? ऑडीटनंतरच्या आकडेवारीने अवाक व्हाल

सध्या पीएम केअर्स फंडात किती रक्कम आहे शिल्लक? ऑडीटनंतरच्या आकडेवारीने अवाक व्हाल

Next

नांदेड : केंद्रातील भाजप सरकारने सुरू केलेल्या ‘पीएम केअर्स फंड’ (PM CARES Fund) या राष्ट्रीय स्तरावरील मदत व पुनर्वसनाच्या खात्यात ३१ मार्च २०२२ अखेर १ हजार ३०१ काेटी रूपयांची शिल्लक नाेंदविण्यात आली आहे. लेखापरिक्षणानंतर ३० सप्टेंबर २०२२ ला ही आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे.

माेदी सरकारने पीएम केअर्स फंडाची (प्राईम मिनिस्टर्स असिस्टंस ॲण्ड रिलिफ इन इमरजंसी सिच्युएशन्स फंड) स्थापना केली. त्यात मार्च २०२० ला ३ हजार ७६ काेटी ६२ लाख ५६ हजार ४७ रूपयांची रक्कम हाेती. मात्र नंतरच्या वर्षभरात यातील सुमारे १ हजार काेटी रूपये काेवीड उपाययाेजनांसाठी खर्च केले गेले. त्यामुळे मार्च २०२१ ला यातील शिल्लक रकमेचा आकडा २ हजार ४० काेटी ८७ हजार ९९६ रूपये एवढा नाेंदविला गेला. २०२२ ला लेखापरिक्षण करून आकडेवारी अपडेट करण्यात आली. ती ३० सप्टेंबर २०२२ ला जाहीर केली गेली. तेंव्हा ३१ मार्च २०२२ ची पीएम केअर्स फंडाची शिल्लक १ हजार ३०१ काेटी एवढी नाेंदविली गेली.

पीएम केअर्सची उद्दीष्टे
पीएम केअर्स फंडातून सार्वजनिक आराेग्य, आपत्ती, गंभीर संकट, मानवी किंवा नैसर्गिक निर्मित संकट, आराेग्य सुधारणा, आवश्यक बांधकामे आदी विषयांमध्ये मदत, संशाेधन व पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाताे.

अशी आहे रचना
पीएम केअर्स फंडाचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. पदसिद्ध सदस्य/ट्रस्टी म्हणून संरक्षण मंत्री, गृहमंत्री व वित्तमंत्र्यांचा समावेश आहे. बाेर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये तीन सदस्य नामनिर्देशीत असतात. सध्या सेवानिवृत्त न्यायमुर्ती के.टी. थाॅमस, करिया मुंडा, रतन एन. टाटा हे नामनिर्देशित सदस्य आहेत. पीएम केअर्स फंडात कुणीही देणगी देवू शकताे. कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीनुसार एखादी कंपनी त्यांचा सीएसआर सुद्धा यात देणगी म्हणून देवू शकताे.

असा झाला निधी खर्च: 
- पीएम केअर्स फंडातून काेराेना काळात उपाययाेजनांसाठी सर्वाधिक खर्च केला गेला. २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशभरातून शासकीय रूग्णालयांसाठी भारतीय बनावटीचे ५० हजार व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले. त्यावर १ हजार ३११ काेटी ३३ लाख ८४ हजार ११२ रूपये खर्च केले गेले.
- काेराेना काळात राेजगाराच्या निमित्ताने बाहेर असलेल्या लाेकांच्या आपल्या राज्यातील स्थलांतरासाठी लाेककल्याण निधी म्हणून १ हजार काेटी रूपये खर्च केले गेले.
-  नऊ राज्यातील ५०० काेविड हाॅस्पीटलला आरटीपीसीआर टेस्टींग लॅब उपलब्ध करून दिल्या गेल्या.
- ऑक्सीजन प्लॅन्टवर २०१ काेटी ५८ लाख ३८ हजार ७८५ रूपये खर्च केले गेले.
- जैव तंत्रज्ञान प्रयाेगशाळा व केंद्रीय औषधालयातून काेविड व्हॅक्सीन उपलब्धतेवर २० काेटी ४१ लाख ६० हजार रूपये खर्च केले गेले.

विदेशातूनही आली मदत: 
- पीएम केअर्स फंडात विदेशातून ४९४ काेटी ९१ लाख ७० हजार ३७६ रूपयांचे याेगदान दिले गेले.
- एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात विदेशातून ३९ लाख ६७ हजार ७४८ रूपयांचा निधी देणगी स्वरूपात मिळाला आहे. 
- पीएम केअर्स फंडात विविध स्तरावरील लाेकसहभागातून ६० हजार १८३ काेटी ७७ लाख ६५ हजार ५६७ रूपये निधी मिळाला.
- पीएम केअर्स फंडातील निधीवर नियमित व्याज २२४ काेटी तर विदेशी निधीवरील व्याज १० काेटी २७ लाख ५७ हजार एवढे जमा झाले आहे.

संकटकाळी मदत झाली
पीएम केअर्स फंडात देशातूनच नव्हे तर विदेशातूनही आर्थिक देणगी दिली जाते.  आपत्तीच्यावेळी हाच निधी लाेककल्याणासाठी खर्च केला जाताे. गेल्या दाेन वर्षांत काेविड उपाययाेजनांसाठी माेठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागला. त्यामुळेच संकटाच्या वेळी नागरिकांना केंद्र शासनाची माेठी मदत झाली. अन्नधान्याची मदत आजही गाेरगरिबांपर्यंत पाेहाेचविली जात आहे.
- विशाल ठाकरे, माहिती अधिकार कार्यकर्ता

Web Title: How much is left in PM CARES fund? You will be stunned by the statistics after the audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.