'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:41 PM2023-04-01T12:41:52+5:302023-04-01T12:42:56+5:30

आठ महिन्यांपूर्वी मुलीच्या पतीचा झाला होता मृत्यू 

'How will I survive my mother'; The girl died on the dead body of her mother In Hadgaon | 'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण

'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण

googlenewsNext

- संदीप तुपकरी
हदगाव:
तामसा येथील गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा वृद्धापकाळाने मृत्यू शुक्रवारी मृत्यू झाला. वार्ता समजताच घरी आलेल्या मुलीने ' आई माझे कसे होणार' असा हंबरडा फोड आईच्या मृतदेहावरच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना ३१ मार्च रोजी घडली. जयमाला दिलीपराव जाधव (५६ ) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. एकाच दिवशी घरात दोन मृत्यू झाल्याने शेवाळकर आणि जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तालुक्यातील तामसा येथील गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा शुक्रवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गयाबाई यांची एक मुलगी जयमाला जाधव काही अंतरावरील येवली गावात राहते. वार्ता समजताच जयमाला यांनी अंत्यदर्शनासाठी माहेर गाठले. मृतदेह पाहत जयमाला यांनी हंबरडा फोडला. 'आई तुझ्याशिवाय माझे कसे होणार', असे म्हणत जयमाला आईच्या मृतदेहावर कोसळल्या. त्यांना लागलीच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

आठ महिन्यांपूर्वी पतीचा झाला होता मृत्यू 
जयमाला यांचे सेवानिवृत्त पती दिलीप जाधव यांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तसेच एक वर्षांपूर्वी जयमाला यांचे सासू-सासरे यांचा देखील मृत्यू झाला होता. सासू-सासऱ्यांच्या पाठोपाठ पतीच्या निधानातून सावरत नाहीत तोवर आईच्या निधनाची वार्ता समजल्याने धक्काबसून जयमाला यांचा देखील मृत्यू झाला.

Web Title: 'How will I survive my mother'; The girl died on the dead body of her mother In Hadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.