एचपी मोटार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:39+5:302021-05-07T04:18:39+5:30
बंगालच्या घटनेचा निषेध नायगाव - विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसेचा नायगावात निषेध करण्यात आला. यावेळी खा. प्रताप पाटील ...
बंगालच्या घटनेचा निषेध
नायगाव - विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसेचा नायगावात निषेध करण्यात आला. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, बालाजी बच्चेवार, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज होटाळकर, माजी नगरसेवक देविदास बोमनाळे, शिवा गडगेकर, महेश देशपांडे आदी उपस्थित होते.
बरबड्याला रुग्णवाहिका
नायगाव - तालुक्यातील बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्यात आली. रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला. रुग्णवाहिका अभावी अनेक अडचणी येत होत्या. याकामी जि.प. सदस्या विजयश्री कमठेवाड, माजी सरपंच बालाजी मद्देवाड यांनी पाठपुरावा केल्याने नवी रुग्णवाहिका मिळाली. यामुळे आरोग्य सेवा अजून चांगली होईल अशी अपेक्षा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पबितवार यांनी व्यक्त केली.
दिगंबर पाटील यांचा गौरव
भोकर - येथील पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दिगंबर पांडुरंग पाटील यांना यावर्षीचे पोलीस महासंचालक पदक बहाल करण्यात आले. पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन पाटील यांचा हा गौरव करण्यात आला. याबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले.
भुतापल्ले यांना निरोप
देगलूर - येथील आगार लेखाकार प्रकाश भुतापल्ले सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी आगारप्रमुख अशोक चव्हाण, वाहतूक निरीक्षक अशोक मुदीराज, संतोष बावणे, मदनेश्वर निमलवाड, बेंद्रीकर, सुनील आकुलवर, माधव कोठारे, मारोतराव चोंडे, रावणपल्ले, शिरगीरे, मठ्ठमवार, सावरगावे, सलगरे, बी. एम. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
दंडात्मक कारवाई
लोहा - लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांवर मंगळवारी मारतळा येथे दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये बोकन ज्वेलर्स, संत बाळगीर महाराज साडी सेंटर, देवकृपा ऑटोमोबाईल्स व ११ किरकोळ विक्रेते यांचा समावेश आहे. एकूण ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पथकामध्ये ग्रामविकास अधिकारी के.जी.पांचाळ, पोलीस कर्मचारी आर.एम.कानगुले, प्रभू मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी काळबा ढगे, राजू पुण्यबोईनवाड आदींची उपस्थिती होती.
बंद शटरआड व्यवहार सुरू
नरसी फाटा - येथील अनेक दुकानदार बंद शटरआड व्यवहार सुरू केल्याचे दिसून येते. एकीकडे लॉकडाऊन असताना व्यापारी त्याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येते. अवैध दारू विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क खाते याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
चित्रकला स्पर्धेचे बक्षीस
किनवट - गोकुंदा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एसबीएनजी ग्रुपने आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण कला शिक्षक शिवराज बामणीकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेमध्ये मयुरी लोंढे, राजेश मस्के, कीर्ती बंडेवार, स्वरुपा कांबळे, अनिकेत भुसे, ओम बोराडे, उत्कर्षा पालोड यांनी यश मिळविले. विजेत्यांना सन्मानपत्र व सहभाग प्रमाणपत्रे डिजिटल स्वरुपात देण्यात आली. यावेळी शिवराज बामणीकर, रमाकांत गायकवाड, आम्रपाली वाठोरे, वंदना गंगाधरे उपस्थित होते.
संतोष तांबे यांचा सत्कार
लोहा - येथील पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाळू पाटील, मिलिंद पाटील यांची उपस्थिती होती. शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला.
गोविंद पवार यांना पदोन्नती
धर्माबाद - येथील पाेलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गोविंद पवार यांची जमादार म्हणून पदोन्नती झाली. बुधवारी पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी पदोन्नती झाल्याचे फीत लावून पवार यांचा सत्कार केला. यावेळी जमादार शेषराव कदम उपस्थित होते.
जिल्हा प्रमुखांची भेट
नायगाव - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी नायगाव येथील कोविड सेंटरला भेट देऊन सोयीसुविधांची माहिती घेतली. यावेळी डॉ. देवणीकर, डॉ. गुंटूरकर, डॉ. बालन, डॉ. अविनाश पांढरे, डॉ. बिडवई, डॉ. ताटे, डॉ. अंजली खंडगावकर, रेखा खटाळे, करुणा बोदलवाड, महानंद कोकीळ आदी उपस्थित होते.
मैलागिरे सेवानिवृत्त
देगलूर - येथील आगारातील चालक गंगाधर मैलागिरे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी वाहतूक निरीक्षक अशोक मुदिराज, संताेष बावगे, मदनेश्वर निमलवाड, सुनील आकुलवार, माधव कोठारे, मारोतराव चोंडे, शेषराव शिरगीरे, सावरगावे, बी.एम. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
चढ्या दराने विक्री
देगलूर - देगलूर येथील काही व्यापारी जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी आहेत. हनुमान मंदिर परिसर, कापड बाजार, जुना सराफा, जुने बसस्थानक, इलेक्ट्रिकल्स, मशनरी, लाईन गल्ली आदी गल्लीबोळातील व्यावसायिक अत्यावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांची लूट होत असल्याची तक्रार आहे.