अनियमिततेची शेकडो प्रकरणे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:22 AM2021-09-05T04:22:36+5:302021-09-05T04:22:36+5:30

चौकट- पोषण आहाराचे नमुनेच गायब समिती सदस्यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. यावेळी शालेय पोषण आहाराच्या नमुन्यांच्या तपासणीची मागणी ...

Hundreds of cases of irregularities uncovered | अनियमिततेची शेकडो प्रकरणे उघड

अनियमिततेची शेकडो प्रकरणे उघड

Next

चौकट- पोषण आहाराचे नमुनेच गायब

समिती सदस्यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. यावेळी शालेय पोषण आहाराच्या नमुन्यांच्या तपासणीची मागणी करण्यात आली; परंतु संबंधितांनी या ठिकाणी नमुनेच न ठेवण्याची चलाखी केली. आलेले सर्व धान्य वापरले असल्याचे समिती सदस्यांना कळविण्यात आले. ही बाब रुलिंगवर घेतली असल्याचे आ. रायमूलकर यांनी सांगितले.

शिक्षण विभागाचे कौतुक

शिक्षण विभागाने जिल्ह्यात अनेक नवीन उपक्रम राबविले आहेत. शाळेतील हजेरी संख्या वाढावी म्हणून अंगत-पंगत यासारखे उपक्रम सुरू केले आहेत; परंतु अशा एक-दोन उपक्रमांनी भागणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन योजना आखाव्या लागणार असल्याचे पीआरसी सदस्यांनी सांगितले.

माझ्याकडे पोतेभर निवेदने

रयत क्रांतीचे आ. सदाभाऊ खोत यांनी मात्र जिल्ह्यातील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे नमूद केले आहे. एक वर्षाचे आयुष्य नसलेले रस्ते जिल्ह्यात आहेत. मयत अन् गावात राहत नसलेल्यांना घरकुले वाटप केली आहेत. शौचालयांचे पैसे दिले नाहीत. पाणीपुरवठा योजनेत तर सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे; परंतु तरीही अहवालात सर्व काही आलबेल असल्याचे दाखविण्यात येते. याबाबत माझ्याकडे तब्बल पोतेभर निवेदने आली असून, विधान मंडळात या बाबी मांडणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Hundreds of cases of irregularities uncovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.