डेंग्यूचे शेकडो रुग्ण, रेकॉर्डवर मात्र ३४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:41+5:302021-08-19T04:23:41+5:30
विशेष म्हणजे कोणत्याही खासगी रुग्णालयात डेंग्यूचा रुग्ण आल्यानंतर त्याबाबतची सविस्तर माहिती प्रशासनाला कळविणे बंधनकारक आहे. परंतु याकडे सर्रासपणे दुर्लक्ष ...
विशेष म्हणजे कोणत्याही खासगी रुग्णालयात डेंग्यूचा रुग्ण आल्यानंतर त्याबाबतची सविस्तर माहिती प्रशासनाला कळविणे बंधनकारक आहे. परंतु याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूचे नेमके किती रुग्ण याचा अंदाजच दरवर्षी प्रशासनाला लागत नाही. त्यामुळे नेमके मृत्यू किती? हेही पुढे येत नाही. त्यामुळे डेंग्यूच्या बाबतीतील हा गाफीलपणा अनेकांच्या जिवावर बेतणारा आहे.
सायंकाळी सहा ते आठ या वेळेत घ्या काळजी
घरात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत साधारणत: डास येतात. त्यामुळे या काळात खिडक्या, दरवाजे बंद ठेवावेत, डासांना मारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, घराच्या आजूबाजूला पाण्याचे डबके असल्यास त्यात गप्पी मासे सोडावेत किंवा त्या डबक्यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, रात्री झोपताना पूर्ण कपडे घालावेत, लहान मुलांचीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.