शेकडो ढेरपोटे पोलिस अनफिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:05+5:302021-09-07T04:23:05+5:30
अनेकांमध्ये वाढली साखर पोलिस दलात रुजू होताना प्रत्येकाची शारीरिक तपासणी केली जाते. परंतु भरतीनंतर शरीर सदृढ ठेवण्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष ...
अनेकांमध्ये वाढली साखर
पोलिस दलात रुजू होताना प्रत्येकाची शारीरिक तपासणी केली जाते. परंतु भरतीनंतर शरीर सदृढ ठेवण्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते. रक्तदाब, मधुमेह, दृष्टिदोष यासोबत हृदय आणि यकृताचे आजार जडतात. आजघडीला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये साखर वाढण्याचे आणि रक्तदाबाचे अधिक प्रमाण असल्याचे दिसून येते. सततच्या आजारामुळे शारीरिक क्षमता कमी होते. त्याचा परिणाम कामावर होते. गुन्हेगारांना पकडणे किंवा तपासात दमछाक होते.
काय म्हणतात कर्मचारी...
दैनंदिन कामातून वेळ मिळत नसल्यामुळे आणि ताणामुळे शरीराकडे दुर्लक्ष होते. अनेकदा १८ तास ड्युटी करावी लागते. महत्त्वाची आंदोलने, राजकीय मेळावे, निवडणुका यामुळे सुट्याही रद्द केल्या जातात. बंदोबस्त किंवा दैनंदिन कामही निश्चित नसते. त्यामुळे जेवणालाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आरोग्यावर परिणाम होतो.
चौकट- १४०० जणांनाच हवा फिटनेस भत्ता
२००८ पासून पोलिस कर्मचाऱ्यांना दरमहा अडीचशे रुपये फिटनेस भत्ता सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु हा ऐच्छिक विषय आहे. त्यात आता अनफिट असताना फिटनेस प्रमाणपत्र सहजासहजी मिळत नसल्याने भत्त्यासाठी येणारे अर्ज कमी झाले आहेत. यंदा फक्त १४०० कर्मचाऱ्यांनी फिटनेस भत्त्यासाठी अर्ज केले आहेत.